यावल : तालुक्यातील डोणगाव येथील ३७ वर्षीय तरुणाने विवाह होत नसल्याच्या नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने रुग्णालयात आणण्यात आले. रूग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डोणगाव ता. यावल येथील बळीराम अरुण पाटील वय ३७ वर्ष हा तरुण आपल्या घरी होता व तो गेल्या काही दिवसांपासुन विवाह होत नसल्याने निराश होता. तेव्हा याच नैराश्यातून त्याने आपल्या राहत्या घराच्या आत सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रूग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा