आ. चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्याने पारोळा नगरपरिषद प्रशासकीय इमारत व व्यापारी संकुल बांधकामासाठी ६.८० रुपयांना मंजुरी.

Spread the love

पारोळा l प्रतिनिधी :– शहरात आजपावेतो आमदार चिमणराव पाटील यांच्या दूरदृष्टीने १०० कोटी पेक्षाही अधिकची विकास कामे मंजूर होवून त्यातील काही कामे पूर्णत्वास आली तर काही कामे सुरु आहेत. गेल्या अनेक दशकांपासून पारोळा शहर हे विकासाच्या दृष्टीने मागे पडले होते. आजू-बाजूच्या शहरांचा होत असलेला विकास बघता नागरिक देखील शहर विकसित कधी होईल या आशेने बघत होते. आज पर्यंत अनेक लोकप्रतिनिधी आले, अनेकांनी मतांचा राजकारणापोटी अनेकानेक भूलथापा मारल्या, लोकप्रतिनिधींनी स्वताच्या वैयक्तिक राजकारणापोटी शहर हे विकासापासून पूर्णपणे दूर ठेवले.

परंतु नागरिकांनी बघितलेल्या स्वप्नाला व त्यांचा आशेला दुजोरा दिला टो म्हणजे आमदार चिमणराव पाटील यांच्या दूरदृष्टीनेच…शहरात आज पावेतो पाणीपुरवठा योजना, जलतरण तलाव, अत्याधुनिक सोईसुविधायुक्त नाट्यगृह, शहरातील विविध कॉलनी भागातील खुल्या जागांचे सुशोभीकरण, प्रमुख चौकांचे सुशोभीकरण, शहरातील महापुरुषांचा पुतळ्यांचे सुशोभीकरण, शहरातील स्मशानभूमींचे सुशोभीकरणासह नुतनीकरण, शहरात मुख्य रस्त्यांवर विद्युतीकरण, शहरात अत्याधुनिक योग प्रशिक्षण केंद्र, शहरातील युवकांसाठी जिम, शहरात फिश, मटन मार्केटची सुसज्ज इमारत,

शहरातील लहान समाजांना हक्काचे व्यासपीठ म्हणून सामाजिक सभागृहे यांचेसह अनेक कामांना आमदार चिमणराव पाटील यांच्या दूरदृष्टीने तसेच शहराचा सर्वांगीण विकासाचा हेतूने मंजुरी मिळाली असून यातील काही कामे पूर्णत्वास आली, काही कामे सुरु आहेत तर काही कामे प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे.या कामांचा मंजुरीसह संपूर्ण शहरात भूमिगत गटार, संपूर्ण शहरात नव्याने रस्ते यांसह विविध लोकाभिमुख योजनांचे प्रस्ताव मंजुरीसाठी आमदार चिमणराव पाटील हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या सर्वच प्रस्तावांना देखील लवकरच मंजुरी मिळणार आहे.

या सर्वच कामांसह इतर शहरांप्रमाणे पारोळा शहरात देखील नगरपरिषदेची प्रशस्त प्रशासकीय इमारत व्हावी, तसेच युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्यापारी संकुलांद्वारे छोट्या-मोठ्या व्यवसायांना गती मिळावी व यातून रोजगार निर्मिती होवून बेरोजगारी काही प्रमाणावर कमी होण्याचा हेतूने आमदार चिमणराव पाटील हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. या प्रयत्नांना व पाठपुराव्याला अखेर यश संपादन झाले असून शासनाचा नगरविकास विभागाकडून “भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेंतर्गत बिनव्याजी कर्ज” या योजनेच्या भाग – ६ नागरी सुधारणा (Urban Reforms) अंतर्गत पारोळा शहरात नगरपरिषद कार्यालयाची प्रशासकीय इमारत व नवीन व्यापारी संकुलाचा बांधकामासाठी ६.८० कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आलेली आहे.

यामुळे नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामांना गती मिळण्यासाठी मोठी मदत होणार असून व्यापारी संकुलामुळे बेरोजगार युवकांना आपल्या छोट्या मोठ्या व्यवसायाला चालना मिळणेसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, या कामांना तातडीने प्रशासकीय बाबींची पूर्तता करून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार