पाचोरा :- तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात केंद्र सरकारच्या स्वच्छता पंधरवड्या अंतर्गत ‘एक तारीख एक तास श्रमदान’ उपक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी स्वच्छता कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व स्पष्ट करून त्याचा मानवी जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम याचे महत्त्व समजावून सांगितले.
या स्वच्छता कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या नवीन इमारत परिसरामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. एस. डी. भैसे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे साहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. ए. मस्की, प्रा. जी. एस. अहिरराव, प्रा. डॉ. चित्रा पाटील, प्रा. डॉ. इंदिरा लोखंडे, प्रा. रचना गजभिये, प्रा. शिवाजी पाटील,प्रा. डॉ. मानसिंग राजपूत, प्रा. ज्योती नन्नवरे, प्रा. प्रवीण देसले तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संदीप केदार, दिलीप तडवी, प्रवीण तडवी यांनी महाविद्यालय परिसर स्वच्छ केला
तर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या इमारतीत बहुसंख्य विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील, अंतर्गत गुणवत्ता सुधार समितीचे समन्वयक प्रा. डॉ. ए. एन. भंगाळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एन. व्ही. चिमणकर, प्रा. डॉ. दीपक मराठे, प्रा. एस. एम. झाल्टे, डॉ. बालाजी पाटील, प्रा. अर्चना टेमकर, शिक्षकेतर कर्मचारी सुनील पाटील, तुळशीराम महाजन, मनोहर महाजन यांनी महाविद्यालयीन परिसर स्वच्छ केला.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.