9 महिन्याच्या चिमुकलीसह आईने घेतला गळफास! आत्महत्येचे कारण काय ?

Spread the love

धुळे प्रतिनिधी |  धुळे तालुक्यातील वणी येथील माळी कुटुंबीयांकडे गोंधळाच्या कार्यक्रमाची लगबग सुरू असतानाच चिमुकलीसह आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. वणी गावातील सुधाकर माळी हा तरुण शेती व मजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. माळी कुटुंबीयांकडे रविवारी (दि.१३) जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. त्यासाठी लगबग सुरू होती. सुधाकर माळी हे त्याची पत्रिका देण्यासाठी चौगाव-गोताणे येथे गेले होते. तर त्यांचे आई-वडील हे शेतात होते. या वेळी सुधाकर माळी यांच्या पत्नी सोनम (वय २३) व ९ महिन्यांची चिमुकली हर्षदा घरी होती. घरी कोणीही नसल्यामुळे सोनमने सुरुवातीला हर्षदाला गळफास दिला. त्यानंतर झोळीच्या दोरीने स्वत: गळफास लावून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पाेलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक भूषण कोते व पथक दाखल झाले. तोपर्यंत दोघांना खाली उतरवण्यात आले होते. त्यानंतर सोनम व हर्षदा यांना हिरे रुग्णालयात नेल्यानंतर दोघांना मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. रविवारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यानंतर दुपारी पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी झाला. २०१७मध्ये विवाह सोनम व सुधाकर यांचा सन २०१७ मध्ये विवाह झाला होता. मृत सोनम यांचे शिंदखेडा येथील माहेर आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनम व सुधाकर वरील खोलीत विभक्त राहत होते. खालील घरात सुधाकर यांचे आई वडील होते.

मग नेमके कारण काय सोनम-सुधाकर वेगळे राहत होते. घरातील वरिष्ठांशी त्यांचा अबोला नव्हता. जागरणाच्या कार्यक्रमासाठी सोनमही उत्साही होती. मग तिने हे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट होऊ शकले नाही. झोळीच्या दोरीने स्वत: गळफास लावून आत्महत्या केली.

टीम झुंजार