यावल शहरात किरकोळ कारणावरून वाद, माजी नगरसेवकाच्या भावाची हत्या, मारेकरी देखील गंभीर जखमी.

Spread the love

यावल : शहरातील बोरावल गेट जवळील धनगर वाड्यात किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला यात एका ६१ वर्षीय इसमाने ५८ वर्षीय इसमावर चाकूने हल्ला केला तर प्रतिउत्तारात ५८ वर्षीय इसमाने देखील ६१ वर्षीय वृद्धाला डोक्यात आणि हातावर दुखापत करून हाताचा मोडला आहे तेव्हा घटनेनंतर दोघांना यावल ग्रामीण रूग्णालयात प्रथम उपचार करून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आज सकाळी गंभीर जखमी असलेल्या नगरसेवकाच्या ५८ वर्षीय भाऊच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावल शहरातील बोरावल गेट भागात शुक्रवारी सायंकाळी प्रभाकर आनंदा धनगर वय ५८ हे एका दुकानावर बसले होते. त्या ठिकाणी रामा ढाके वय ६१ हा आला आणि दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. तेव्हा यात रामा ढाके येणे प्रभाकर धनगर यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केला तर प्रतिउत्तरात धनगर यांनी देखील एका लोखंडी रॉड ने रामा ढाके याच्या डोक्यावर वार केले आणि हातावर वार केल्याने डावा हात मोडला गेला आहे.

दोघांना जखमी अवस्थेत तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे, डॉ. इरफान खान, अधिपरिचारिका माधुरी ठोके, संजय जेधे,रऊफ खान आदींनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता हलवण्यात आले आहे.

आज सकाळी गंभीर जखमी असलेल्या माजी नगरसेवकाच्या भाऊ प्रभाकर आनंदा धनगर वय ५८ वर्ष यांच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावल शहरात झालेल्या या एकामेकावरील हल्ल्याच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती तर रात्री उशिरापर्यंत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर, सहायक फौजदार असलम खान, रोहिल गणेश सह आदींची घटनास्थळी भेट देवुन या भागात शांतता प्रस्तापित केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार