आदिवासी कोळी समाज अन्नत्याग उपोषणाची आदिवासी कोळी समाज अन्नत्याग उपोषणाची पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुका स्तरावर बैठकीत निश्चय
पाचोरा:- आज दि.08/10/2023 रोजी पाचोरा स्वामी लाॅन्स पाचोरा येथे मा. प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली , प्रल्हाद सोनवणे(जिल्हा अध्यक्ष) जितेंद्र सपकाळे , संभाजी शेवरे,संजय सोनवणे चाळीसगाव, दशरथ जाधव, राजेंद्र मोरे सर पाचोरा, मच्छिंद्र आबा चाळीसगाव, किरण कोळी, ॲड.शांतीलाल सैंदाणे,
खेमचंद कोळी, नामदेव कोळी,अनिल सावळे (सामाजिक कार्यकर्ते) अशोक महाले, अशोक सपकाळे , रविन्द्र शेठ ननावरे, किशोर रायसाकडा, सचिन सोनवणे, दिपक शेवरे, अनिल मासरे, अनिकेत सुर्यवंशी, रविन्द्र सुर्यवंशी, प्रविण मोरे, पप्पू कोळी, ठाकरे सर,महारु कोळी, संजय कोळी, बि.टी.बाविस्कर, संजय मासरे, भिकन कोळी शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी जळगाव येथे होऊ घातलेल्या अन्नत्याग उपोषणासाठी संपुर्ण पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यातील कोळी समाज मोठ्या संख्येने सहभाग घेणार असल्याचे घोषित करण्यात आले, तसेच या उपोषणासाठी पाचोरा तालुक्यातील महीला,तरुण, विवीध संस्था/संघटना पदाधिकारी, विदयार्थी, यांचा सहभागासाठी आवाहन करण्यात आले
1 .सुलभरित्या सरसकट जात प्रमाणपत्र मिळावे 2. जळगाव येथे जात पडताळणी समिती कायमस्वरूपी जळगाव येथे यावी 3.इतर समाजाप्रमाणे आदिवासी कोळी समाज विकासासाठी महर्षि वाल्मीकी ऋषी यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण चालूच राहिल असे प्रभाकर आप्पा यांनी सांगितले सूत्रसंचालन सुभाष सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन संभाजी शेवरे यांनी मानले.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.