जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र आणि कुटुंबीयां समवेत दिवस आनंदात घालवाल. जास्त लोकांच्या संपर्कात याल. व्यापारी वर्ग व्यापारवाढ आणि नियोजन करू शकतील. आपल्या हातून लोकहिताचे एखादे काम होईल.
वृषभ:
परिश्रमाच्या तुलनेत अल्प मोबदला मिळेल तरीही आपण निष्ठेने कार्य पुढे न्याल. कामाचा व्याप आणि आपली मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व त्यातून लाभ होतील. मुदूभाषा नवीन संबंध स्थापित करण्यात मदत करेल. कला, लेखन, वाचन यांत रुची वाढेल. विद्याभ्यासाला काळ अनुकूल आहे. बाहेर जेवण टाळा अन्यथा पचनाच्या तक्रारी येण्याची शक्यता आहे. असे श्रीगणेश सांगतात.
मिथुन:
आत्मंतिक भावनाशील मनाला संवेदनशील बनवेल असे श्रीगणेश सांगतात. जलाशय आणि स्त्री वर्गापासून सावध राहा. मनःस्थिती दोलायमान राहिल्याने निर्णय शक्तीचा अभाव राहील. आईच्या तब्बेती विषयी काळजी राहील. कौटुंबिक तसेच जमीन जुमला विषयक प्रश्न हाती न घेणेच हिताचे ठरेल. शांत झोप लागणार नाही. त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल.
कर्क:
आज कार्यसाफल्य आपली वाट पाहत आहे असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. मन ताजेतवाने व प्रफुल्ल राहील. मित्र, आप्तेष्टांसोबत संवाद होतील व प्रवासाचा बेत ठरवाल. भाग्यदेवीची साथ मिळेल. कार्यक्षेत्रातील प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.
सिंह:
श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस संमिश्र फलदायी जाईल. दीर्घकालीन नियोजनामुळे द्विधा अवस्था राहील. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. परिवारात सुसंवाद राहील. दूरस्थ स्नेही व मित्र यांच्याशी होणारी बोलणी लाभदायक ठरतील. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. संताप आणि अहंकार आपले काम बिघडवेल.
कन्या:
आपली मधुर वाणी जिव्हाळ्याचे संबंध स्थापायला उपयोगी पडेल. वैचारिक भरभराट होईल. व्यापार धंद्यात लाभ व यश मिळेल. शारीरिक-मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र व स्नेह्यांशी भेट व संवाद होतील. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळून आनंद होईल. दांपत्यजीवन गोडी राहील.
तूळ:
आज तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्वास्थ्य पण कमी राहील. अविचारी आणि मनमानी व्यवहार संकटात टाकील. वाणीवर संयम ठेवा नाही तर कोणाशी भांडणतंटा होईल. मौजमस्ती व मनोरंजन यावर खर्च होईल. अशा वेळी आध्यात्मिक काम मदत करेल असे श्रीगणेश सांगतात.
वृश्चिक:
श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज नोकरी- व्यवसायात लाभच लाभ आहेत. तसेच मित्र- आप्तेष्ट व वडीलघार्यांकडूनही लाभ मिळण्याचे संकेत आहेत. सामाजिक समारंभ, पर्यटन इ. साठी जाल. शरीर व मन खूपच प्रसन्न राहील. उत्पन्नाची साधने वाढतील. अविवाहितांना विवाहयोग आहेत. सांसारिक जीवनात आनंदाचा अनुभव मिळेल.
धनु:
श्रीगणेश सांगतात की आज यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडील तसेच सरकारकडून फायदा मिळेल. आर्थिक योजना चांगल्याप्रकारे पूर्ण कराल. व्यापार धंद्यासाठी प्रवास घडू शकतो. इतर लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.
मकर:
श्रीगणेश म्हणतात की, बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. शारीरिक थकवा जाणवेल. संततीच्या समस्या तुम्हाला त्रस्त करतील. व्यर्थ खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा.
कुंभ:
श्रीगणेश आपल्याला आज निषेधात्मक आणि नकारात्मक विचारापासून दूर राहायला सांगतात. वाद, भांडणे यापासून दूर राहा. राग व बोलण्यावर संयम ठेवा. कौटुंबिक वातावरण कलुशित राहील. आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्याने मानसिक थकवा जाणवेल. ईश्वराचे स्मरण आणि आध्यात्मिकता आपल्या मनावरचा ताण कमी करेल.
मीन:-
श्रीगणेश म्हणतात की, दैनंदिन कामातून बाहेर पडून आज तुम्ही सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ घालवाल. स्वजनांबररोबर पिकनिक साठीही जाऊ शकता. सिनेमा नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलाकार किंवा कारागिराला आपल्या कामाचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी साठी चांगला योग आहे. दांपत्यजीवनात अधिक जवळीक निर्माण करता येऊ शकते. सार्वजनिक जीवनात मान सन्मान मिळेल.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा