यावल : तालुक्यातील बामणोद येथे एका ३५ वर्षीय महिलेच्या घरात जाऊन तिच्या पतीला शिवीगाळ करून एकाने या महिलेचा हात पकडला व तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बामणोद ता. यावल या गावात वाघोदा ता. रावेर येथील शुभम वाघ हा आला आणि त्याने ३५ वर्षीय महिलेच्या घरात जाऊन तिच्या पतीच्या संदर्भात विचारणा केली. महिला स्वयंपाक करत असतांना त्याने तिच्या पतीला शिवीगाळ केली आणि महिलेचा उजवा हात पकडून तिच्या अंगावर ओढून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला.
तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळू भोई करीत आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा