रावेर: – दररोज आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून यात आता किशोरवयीन मुलांचीही त्यात भर पडत चालल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान रावेर तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक येथे नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
नंदिनी दीपक महाजन (वय १५, रा. केऱ्हाळे बु. ता. रावेर) असे मयत विद्यार्थिनीचे नाव असून या घटनेने परिरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, नंदिनीच्या आत्महत्यामागील कारण समजू शकले नसून याबाबत रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
केऱ्हाळे बु. येथे नंदिनी दीपक महाजन ही तिची आईची आई अर्थात आजीसोबत राहत होती. तिचा मामा एक वर्षांपूर्वी वारला आहे. तर आई लहानपणापासूनच विभक्त झाली असून वडील दीपक यांचे निधन झालेले आहे. ती केऱ्हाळे गावात दत्तू सोनजी माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होती. तिची आजी निर्मला भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करून दोघांचे पोट भरत होती. शनिवारी आजी निर्मला महाजन बाहेरगावहून भाजीपाला विक्री करून रात्री ८ वाजता घरी परतल्यावर तिला दरवाजे बंद आढळले.
त्यांनी शेजारील घराच्या छतावरून जाऊन जिन्याद्वारे स्वतःच्या घरात प्रवेश केला. यावेळी नात नंदिनी हिने गळफास घेतल्याचे दिसले. तेव्हा तिने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी नंदिनीला रुग्णालयात दाखल केले. रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार करीत आहे. दरम्यान, नंदिनी हुशार होती. मनमिळावू, गोंडस मुलगी होती. मात्र तिने अचानक आत्महत्या करण्याचे कारण काय हा आता तपासाचा भाग आहे. गावात हळहळ व्यक्त होत आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






