यावल : तालुक्यातील किनगाव येथील मुख्य चौकातून दुचाकी चोरी प्रकरणी यावल पोलिसांनी चार संशयीतांना अटक केली आहे तर या चौघांना येथील न्यायालयात हजर केले असता चौघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
किनगाव बुद्रुक ता. यावल या गावात मुख्य चौकात गोपाळ बारी यांच्या घरासमोर कैलास युवराज वराडे यांनी आपली मोटरसायकल क्रमांक एम. एच. १९ ए. एच. ६५५७ ही लावली होती. तेव्हा ही दुचाकी तेथून फकीरा कोळी, फारूख तडवी दोघे रा. किनगाव आणी अजय सावळे रा.नायगाव या तिघांनी चोरी केली होती व ही दुचाकी हर्षल गोकुळ भालेराव रा.जुने जळगाव यास विक्री करण्या करीता दिली होती
तेव्हा या चौघांना पोलिसांनी अटक केली व रविवारी येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्यायधिश एस.बी.वाळके यांच्या समोर हजर केले असता चौघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले, वासुदेव मराठे करित आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन