पारोळ्यात शासकीय हरभरा खरेदीस सुरवात,5230/ ₹ हमी भाव

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । पारोळा

पारोळा :- रब्बी हंगाम २०२१-२२ करिता नाफेड या संस्थेमार्फत शासनाने आधार भुत किंमत योजने अंतर्गत दि महाराष्ट्र राज्य सह. पणन महासंघ, मुंबई च्या वतीने हरबरा खरेदी केंद्राचा शुभारंभ पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांचे हस्ते करण्यात आला. या योजनेसाठी शेतकरी नाव नोंदणी ही सुरू असून आता पर्यत 368 शेतकऱ्यांना नावनोंदणी केली आहे. 5230 रुपये इतका हमी भावाने हरभरा खरेदी करण्यात येत आहे.

या कार्यक्रम प्रसंगी तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील , बाजार समितीचे उपसभापती दगडु पाटील, शेतकी संघ अध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष नाना पाटील, बाजार समिती संचालक चतुर पाटील, जिजाबराव पाटील, विजय पाटील, मधुकर पाटील, प्रा.बी.एन.पाटील , प्रेमानंद पाटील, राजु मराठे, शेतकी संघ संचालक राजेंद्र पाटील, सखाराम चौधरी, आधार पाटील, चेतन पाटील, सुधाकर पाटील, व्यवस्थापक भरत पाटील, शंतनु पाटील, युवासेना तालुकाप्रमुख दादा पाटील, मेहु सरपंच विकास बोरसे यांचेसह शेतकी संघ, बाजार समिती कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

टीम झुंजार