जळगाव :- तालुक्यातील वावडदे म्हसावद परिसरातील जळके विटनेर रामदेव वाडी वसंत वाडी तांडा लमाजन कुराडदे वाकडी वडली पाथरी डोमगाव म्हसावद या १६ खेडया गावांसह गावठी दारू दारु सट्टा पत्ता अवैधरीत्या रेती वाहतुक यासह गावातील तरुण सुशिक्षित बेरोजगार मुलं व्यसनाधीन होताना दिसत आहे .
याबाबत स्थानिक प्रशासन कठोर पाऊल उचलताना दिसत नाही. गेल्या वर्षी वावडदे ग्रुप ग्रामपंचायत यांनी 300 महिलांचे ग्रामपंचायत ठराव केलेला होता व हा ठराव संबंधित सर्व अधिकारी यांना देण्यात आलेला होता ह्या ठराविषयी सर्व अधिकारी यांनी केळाची टोपी लावल्याची दिसत आहे फक्त हप्त्यांची वसुली होऊ द्या दोन नंबर धंदे चालू द्या अशी अवस्था दिवसेंदिवस या अवैध धंदे होताना दिसत आहे.
सदरील हे विषय लक्षात घेता वावडदा बिलखेडा ग्रुप ग्रामपंचायत परिसरातील समाजसेवक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन अतिशय तातडीचा तक्रार अर्ज चे निवेदन माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब.उपमुख्यमंत्री. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोता भेटुन निवेदन देण्यात आले तरी याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी कारवाई करते याबाबत परिसरातील ग्रामस्थांचं सह सामाजिक कार्यकर्ते लक्ष वेधले जाणार आहे…
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४