जुन्या मीटर ऐवजी नवीन वीज मीटर लावण्यासाठी २५ हजाराची लाच घेताना वायरमनला रंगेहात पकडले.

Spread the love

जळगाव :- वीज वितरण कंपनीच्या ग्राहकाला जुन्या मीटर ऐवजी नवीन मीटर लावण्यासाठी २५ हजाराची लाच घेताना वीज वितरण कंपनीच्या वायरमनला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.संतोष भागवत प्रजापती ( वय ३२, व्यवसाय , वरिष्ठ तंत्रज्ञ, वायरमन) असे अटक केलेल्या वायरमनचे नाव आहे.
याबद्दलची माहिती अशी की, तक्रारदार याच्या आईच्या नावाने जुन्या घराचे विजचे मीटर आहे. विज मीटर हे फार जुने असून नादुरूस्त असल्याने तक्रारदाराने कंपनीला कळविले होते.

दरम्यान वरिष्ठ तंत्रज्ञ, वायरमन संतोष भागवत प्रजापती यांनी त्याच्याकडे नवीन मीटर बसवण्यासाठी २५ हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबद्दलची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला सांगितली. यानंतर पोलिस उपअधीक्षक ला. प्र. वि. (जळगाव) आणि सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे याच्या टिमने सापळा रचून २५ हजाराची लाच स्विकारताना संतोष याला रंगेहात पकडले.

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक अमोल वालसाडे, स. फौ. सुरेश पाटील, पो. ह. रविंद्र घुगे, म. पो. हे. कॉ. शैला धनगर, पो. ना. किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पो. कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ. राकेश दुसाणे, पो. कॉ अमोल सुर्यवंशी, पो. कॉ. प्रणेश ठाकुर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा अधिक तपास अधिकारी पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, ला. प्र. वि. करीत आहेत. या प्रकरणी रामानंद पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार