जळगाव : एकट्या राहत असलेल्या सपना उर्फ स्वप्ना जगदीश भोई (३१, रा. हरिविठ्ठल नगर) या महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री मयत महिलेची बहीण आली त्या वेळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मजुरी काम करणाऱ्या सपना भोई या हरिविठ्ठल नगर परिसरात एकट्याच राहत होत्या. त्यांनी मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या घराच्या मागील गल्लीत राहणारी त्यांची बहिण मंगलाबाई ढोले या सपनाच्या घरी आल्या.

त्यावेळी घराचा मुख्य दरवाजा ढलताच त्यांना बहिणीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी आक्रोश केला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






