आजचे राशी भविष्य शनिवार २१ ऑक्टोबर २०२३

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:

या राशींतील लोकांसाठी आजचा दिवस अधिक काळजी घेण्याचा आहे. यामुळे कौटुंबिक पातळीवर पत्नीच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक नियोजानावर सावधानी पूर्वक निर्णय घ्या. घरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहनापासून इजा संभवते आहे, शक्यतो प्रवास टाळा. व्यसानापासून दूर राहा. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

वृषभ:

आज चंद्र शुक्राच्या नक्षत्राशी संयोग करीत आहे. कामकाजात जबाबदारी वाढेल. व्यापारात मिळालेली नवी संधी सोडू नका. समजात प्रतिष्ठा वाढणार असून नोकरीत हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शक्यता आहे. भांवडाशी सलोख्याचे संबंध राहतील. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील.

मिथुन:

आज शनि आणि चंद्रबल अनिष्ट राहील. व्यापारात गुंतवणुक करणे टाळा. व्यवहार करताना सावधानी बाळगावी. आयुष्यातील जोडीदाराकडून अनुकूल सहकार्य लाभेल. नोकरीत प्रगती होईल. कुटुंबातून सहकार्य लाभेल. स्वभावातील मानीपणा हट्टीपणा सोडा. कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होऊ नये, याची काळजी घ्या.

कर्क:

आज आपल्या राशीचा स्वामी चंद्र केंद्र स्थानात आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नोकरदारांनी सावधानीपूर्वक जबाबदारीचे कामी पार पाडावीत. व्यापारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. वाईट सवयींमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सिंह:

आज आपल्या राशीवर रवि- बुध युतीचा अशुभ प्रभाव असेल. नवी योजनाबाबत विचार करत असाल तर आजचा दिवस अडचणीचा आहे. आपले प्रयत्न यशस्वी होण्यास अडथळे निर्माण होतील. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणूक करणे महागात पडेल. आर्थिक अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. आर्थिक आणि मनस्ताप हानी होण्याची शक्यता आहे.

कन्या:

आज चंद्र संक्रमणात आत्मबल उत्साहात वाढेल. कोणतेही काम सहजरित्या पूर्ण होईल. रोजगारात धनलाभ होण्याचे योग आहेत. व्यापारिक वाद मिटतील. सरकारी कामे वेळेत पूर्ण होतील. कोणत्याही व्यक्तीशी वाद घालू नये. प्रवासातून धनलाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ:

आज प्लुटो-चंद्र युतीत राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. शांत स्वभावाने केलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. मात्र, घरातील सदस्याशी मदभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. शुभकार्यात पैसे खर्च होतील. व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळण्याची शक्यता आहे. वादविवाद टाळावेत. पत्नीच्या सहकार्याने काही योजनावर कार्य सुरु कराल. आर्थिक स्थितीत प्रगती होईल.

वृश्चिक:

आज मंगळ-बुध लाभ स्थानात आहे. वेळेत कामाकाजाला सुरुवात करा. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिनमान आहे. व्यापारात फायदा होईल. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. संततीकडून समाधान लाभेल. परदेशगमनाची शक्यता आहे. प्रवासातून लाभ होतील. आरोग्य उत्तम राहणार आहे.

धनु:

आज चंद्र गुरूच्या प्रतियोगात आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्यांवर सहज मात कराल. नोकरीत स्वतःचे निर्णय महत्वपूर्ण राहतील. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परिक्षेत यश निश्चित मिळेल. जोखमीचे कामे आज टाळावेत. विचारपूर्वक केलेली मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

मकर:

आज आपल्या राशीत चंद्र संक्रमण होत आहे. नोकरीत या योजना भविष्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. आधी केलेल्या कामांचा आज लाभ होण्याची शक्यता आहे. पुरस्कार आणि मान-सन्मानाचे योग आहेत.

कुंभ:

आज चंद्रगोचर प्रतिकूल असल्याने नोकरी रोजगात मनाची अस्वस्थता वाढवणारे प्रसंग घडतील. आर्थिक टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. कमाईपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्या. वाहन सावकाश सांभाळून चालवा.

मीन:-

आज चंद्रभ्रमण अनुकूल स्थानातून होणार आहे. आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आपल्या समस्या दूर होतील. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. नोकरीत प्रगती होण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील सदस्यांची प्रगती होईल. विचारपूर्वक कामे केली तर आजचा दिवस चांगला जाईल. पल्या कामाची स्तुती होईल. मानसन्मान वाढीस लागेल.

हे पण वाचा


टीम झुंजार