कंपनीत कामाचा पहिल्याच दिवशी विजेचा धक्का लागल्याने २२ वर्षीय तरुणाचा दुदैवी मृत्यू.एक जखमी.

Spread the love

जळगाव :- एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीत कामाला लागला. नवीन कंपनीत हजर होण्याचा पहिलाच दिवस असल्याने वेळेवर कामावर हजर झाला. परंतु त्याचा हा कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला.कंपनीत काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने २२ वर्षीय तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे.

जळगाव एमआयडीसीत असलेल्या कंपनीत ही घटना सोमवारी (१६ ऑक्टोबर) घडली. राहूल दरबार राठोड (वय २२, रा. शेलगाव, ता. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर जीवन गजानन चौधरी (वय २०, रा. बेटावद ता. जामनेर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहूल राठोड हा गेल्या २० वर्षांपासून आई-वडील व लहान भाऊ यांच्यासोबत जळगाव शहरातील फातीमानगरात वास्तव्याला होता.
कंपनी बदलली

गेल्या काही वर्षांपासून मत राहूल राठोड हा एमआयडीसीतील एका कंपनीत वेल्डींग करण्याचे काम करत होता. नंतर ते काम सोडून सोमवारपासून त्याने प्लास्टीक कंपनीत कामाला सुरूवात केली होती. त्यानुसार सोमवारी १६ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता कामावर हजर झाला. यावेळी कंपनीत काम करत असताना मशीनमुळे विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला जीवन चौधरी हा गंभीररित्या भाजला गेला आहे. दोघांना तातडीने खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी राहुल यास मृत घोषित केले.

हे पण वाचा

टीम झुंजार