जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
लक्ष्मीकृपेचा आज आपल्यावर वर्षाव होईल असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक पातळीवर यश आणि कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहोत्सुकांना यश मिळेल. दुपारनंतर मात्र तब्बेत बिघडू शकते. गुंतवणूक विचारपूर्वक करा. कुटुंबात विरोध होईल. सबब मौन पाळणे सर्वोत्तम. इतरांच्या भानगडीत फसू नये असा सल्ला श्रीगणेश देतात. वाहन चालवताना अपघातापासून जपा.
वृषभ:
श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसायात अनुकूल स्थिती. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सरळ पार पडतील आणि त्यांच्यापासून लाभ होईल. दांपत्य जीवनात आनंद दरवळेल. नवीन कार्याच्या आयोजनासाठी चांगला काळ. सामाजिक आणि आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. एखाद्या मनोरम्य स्थळी जाण्यासाठी सहलीचे आयोजन कराल.
मिथुन:
प्रतिस्पर्धी आणि वरिष्ठांशी वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. आनंददायक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य पण चांगले असेल दुपारनंतर शारीरिक व मानसिक दृष्ट्या अनुकूलता जाणवेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. धनप्राप्तीचे योग आहेत. परिवारात सुख शांती नांदेल.
कर्क:
अनैतिक आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य सतावेल. दुपारनंतर परदेशातून वार्ता येतील. संततीविषयक काळजी राहील. वरिष्ठांशी केलेला व्यवहार तुमच्या मनाला दुःख देईल. तरीही प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.
सिंह:
आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र आणि संबंधितांसोबत हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी प्रवासही कराल. सामाजिक सन्मान मिळेल. भागीदारांबरोबर सकारात्मक चर्चा होईल. दुपारनंतर मानसिक शैथिल्य जाणवेल. संतापाची भावना वाढेल. कुटुंबात वादविवाद होऊ नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. खर्च वाढल्याने आर्थिक कष्ट जाणवतील. आंतरिक शांतते साठी देवभक्ती आणि अध्यात्म मदत करतील.
कन्या:
स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश आणि कीर्ती वाढेल. माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रसन्नता जाणवेल. घरात सुखशांती राहील. प्रत्येक कामात खंबीर मनोबल आणि आत्मविश्वास दिसून येईल. प्रवासाची शक्यता.

तूळ:
आपण बौद्धिक शक्तीमुळे लेखन वा अन्य सृजनकार्य करण्यात आघाडीवर असाल असे श्रीगणेश सांगतात. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. सबब यात्रा- प्रवास टाळावा. अचानक खर्च उद्भवतील. दुपारनंतर कामे यशस्वी झाल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आज यश आणि कीर्ती प्राप्त होईल. व्यवसायात चांगले सहकार्य लाभेल. कुटुंबात आनंदपूर्ण वातावरण राहील.
वृश्चिक:
आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. स्वभावातील हट्टीपणा सोडून वागल्याने अनेक समस्या सुटतील. नवी वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधने यांवर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक योजना सहज आखाल. दुपारनंतर वैचारिक स्थिरता राहणार नाही. नवीन कार्य आज हाती घेणे हिताचे ठरणार नाही.
धनु:
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश सूचित करतात. घरातील सदस्यांसह प्रवास- पर्यटन कराल. मित्र आणि स्वकीयांसोबत वेळेचा सदुपयोग आनंदपूर्वक होईल. दुपारनंतर शारीरिक व मानसिक दृष्ट्या बेचैन राहाल. सौंदर्य प्रासधने, गृहसजावट आणि मनोरंजनाची साधने खरेदी कराल. स्थावर मालमत्ते विषयक कागदपत्रांवर सही- शिक्का देताना सावध राहा.

मकर:
श्रीगणेशांचा सल्ला आहे की अधिक वाद-विवाद न करणे आपल्या हिताचे आहे. धार्मिक कार्य आणि उपासनेसाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपारनंतर मन प्रफुल्लित राहील. शारीरिक स्वास्थ्य मिळेल. भाग्योदयाचे योग आहेत. छोटा प्रवास घडण्याचे योग आहेत. प्रिय व्यक्तींच्या भेटी मुळे मनाला आनंद वाटेल.
कुंभ:
आज प्रापंचिक बाबीं ऐवजी आध्यात्मिक विषयांकडे आपला जास्त कल राहील. नकारात्मक भावनेला महत्त्व न देता. मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील. धार्मिक कार्याकडे दुपारनंतर आकर्षित व्हाल. लेखन- वाचनात विद्यार्थ्यांना अनुकूलता राहील. गृहस्थी जीवन शांततामय असेल. धनलाभ होण्याची शक्यता.
मीन:-
कोणाशी आर्थिक व्यवहार करू नका व वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेशजी देतात. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुप्रसंग उद्भवतील. दुपारनंतर तब्बेतीत सुधारणा होईल. मनःस्वास्थ्यही मिळेल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. कुटुंबीयांकडून सुख मिळेल आध्यात्मिक बाबींवर मन एकाग्र होईल.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा