झुंजार प्रतिनिधि। एरंडोल
एरंडोल :- तालुक्यातील जवखेडे सिम येथील ग्राम पंचायतीचे लोकनियुक्त सरपंच दिनेश जगन्नाथ पाटील. यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्या मुळे त्याना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे म्हणून प्रवीण दत्तु पाटील यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर चौकशी होऊन बेकायदा अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे,जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिनेश पाटील यांना सरपंच व सदस्य पदावरुन दिनांक 16. 3. 2022. रोजी अपात्र ठरविले आहे.
या बाबत सर्विस्तर वॄत असे कि.जवखेडे सिम ता एरंडोल येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश जगन्नाथ पाटील यांनी शासकीय जमिनीवर विना परवानगी अतिक्रमण केल्यामुळे त्यांना सदस्य व सरपंच पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून प्रवीण दत्तु पाटील यांनी ग्रा. प. अधिनियम 1958 चे कलम 14.जे- 3 प्रमाणे जिल्हाधिकारी यांचे कडे विवाद अर्ज क्र-45/ 021. ने तक्रार दाखल केली असता त्यावर चौकशी होऊन सरपंच यांनी शासकीय जमिनीवर शासनाची कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशिर व अनधिकृत पणे भोगवटा सदरी नाव लावुन घेतले आहे व सदर मिळकत ताब्यात ठेवून पदाचा दुरूपयोग केला असल्याचे सिद्ध झाल्यामुळे दिनेश पाटील (आमले) यांना ग्रा. प. सरपंच व सदस्य पदावरुन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अपात्र ठरविले आहे.
माझी आत्या वजाबाई देवराम पाटील यांना शासनाने घरकुल दिले होते व आत्यास कोणीही वारस नसल्या मुळे त्यांनी सदर जागा मिळकत माझे नावे करुण दिली होती मि स्वत: हुन अतिक्रमण केलेले नाही हा सामनेवाले चा बचाव देखील फेटाळण्यात आला आहे. या निकाला मुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. तक्ररदार प्रवीण दत्तु पाटील यांचे वतीने अँड. विश्वासराव भोसले. यांनी काम पाहिले. या निकाला कडे तालुक्याचे लक्ष्य लागुण होते.