जळगाव :- शहरातील आनंद मंगल सोसायटी पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अभिषेक सुभाष राठोड (वय-२२) रा. आनंद मंगल सोसायटी, पिंप्राळा असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,जळगाव शहरातील पिंप्राळा भागात अभिषेक राठोड हा तरूण आईवडील आणि मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो मुंबईतील एका लॉ महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता. दुचाकी अपघात झाल्याने गेल्या दीड महिन्यांपासून तो जळगावात राहत होता. मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अभिषेक याने आशाबाबा नगर येथे धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून पंचनामा केला. त्याच्या जवळील मोबाईलच्या आधारे ओळख पटली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. एकीकडे दसरा निमित्त घरात आनंदाचे वातावरण असतांना मुलाने आत्महत्या केल्याचे राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे करीत आहे. अभिषेक हा पोलीस मुख्यालयातील कंट्रोल रूममध्ये कार्यरत असलेले सुभाष राठोड यांचा मुलगा होता. मयताच्या पश्चात आई किर्ती, वडील सुभाष राठोड, मोठा भाऊ आकाश असा परिवार आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






