जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
आपला दिवस अस्वास्थ्य आणि त्रासात जाईल असे गणेशजी सांगतात. ताप, सर्दी, खोकला यांचा त्रास संभवतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर आपत्ती येईल. पौशाच्या देण्या- घेण्याचे व्यवहार करू नका आणि कोणाला जामीन राहू नका. निर्णयशक्तीच्या अभावामुळे मनःस्थिती द्विधा होईल. त्यामुळे चिंता वाढतील. अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्यापासून जपा.
वृषभ:
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ फलदायी राहील. धनवृद्धी होईल आणि पदोन्नति मिळेल. व्यापारातील सौंदर्यामध्ये यश मिळेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत आनंदाचे सुखद क्षण प्राप्त कराल. जवळचा प्रवास घडेल आणि नवीन संबंध प्रस्थापित होतील
मिथुन:
आजचा दिवस शुभ आणि अनुकूल असल्याचा संदेश श्रीगणेश देतात. सहकारी आणि वरिष्ठ अदिकार्यांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक दृष्टीने मान- मरातब वाढेल. बढतीचे योग आहेत. स्नेहयांकडून भेटवस्तू मिळतील. तब्बेत चांगली राहील. प्रापांचिक जीवन आनंदपूर्ण राहील.

कर्क:
श्रीगणेश सांगतात की आज भाग्योदया बरोबरच अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून सुवार्ता मिळतील. धार्मिक कार्य किंवा यात्रा यावर खर्च होईल. कुटुंबीय आणि पदाधिकारी यांच्या समवेत दिवस सुखकारक राहील. नोकरदारांना पण लाभ मिळेल.
सिंह:
श्रीगणेशांना वटते की आजचा दिवस तुम्हाला मध्यम फल देणारा जाईल. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्या. धार्मिक किंवा शुभ कार्यात आजचा दिवस जाईल. धार्मिक प्रवास घडतील. आज आपण रागात राहाल. ज्यामुळे मन अशांत होईल. संततीकडून काळजीत राहाल. तसेच व्यवसायात अडथळा येईल. परदेशातील आप्ताकडून बातम्या कळतील.
कन्या:
आज नवीन कामाची सुरूवात न करण्याचे श्रीगणेश सांगतात. आरोग्य सांभाळा. बाहेरचे खाणे-पिणे टाळा. आज आपला स्वभाव रागीट असेल त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबियासोबत रागात वागून मन दुःखी होणार नाही याची काळजी घ्या. खूप खर्च होईल. पाण्यापासून सांभाळा. सरकार विरोधी कृत्ये, भांडणे यापासून दूर राहा.
तूळ:
आजचा आपला दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. नवीन वस्त्र खरेदी कराल. तसेच वस्त्रालंकार वापरण्याचे प्रसंग येतील. शरीर आणि मन तंदुरुस्त राहील. लोकांमध्ये मान- सम्मान मिळेल. भोजनसुख सुद्धा मिळेल असे श्रीगणेश सांगतात.
वृश्चिक:
आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य चांगले राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मैत्रिणी भेटतील. तसेच माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल व खोळांबलेली कामे मार्गी लागतील असे श्रीगणेशांचे मानणे आहे.
धनु:
आज प्रवास टाळा कारण पोटाच्या तक्रारी निर्माण होतील असे श्रीगणेश म्हणतात. संततीचे आरोग्य आणि अभ्यास या संबंधी काळजी लागेल. कामे अयशस्वी झाल्याने निराशा येईल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवा. साहित्य आणि कला याविषयी गोडी राहील. कल्पना जगात सैर कराल. प्रिय व्यक्तींच्या सोबत वेळ चांगला जाईल. तार्किक आणि बौद्धिक चर्चेपासून दूर राहा.

मकर:
शारीरिक स्वास्थ्य आणि मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती आणि उत्साहाचा अभाव जाणवेल. जवळच्या नातलगांबरोबर मतभेद होतील. छातीत वेदना होतील. शांत झोप मिळणार नाही. सामाजिक दृष्टीने अपमान होण्याची शक्यता आहे. सबब वाणी आणि स्त्रियांपासून दूर राहा. मनःस्ताप आणि प्रतिकूल वातावरणामुळे दिवस कटकटीचा जाईल.
कुंभ:
मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल कारण मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. घरतील भावंडांबरोबर एखादे नवीन कार्य कराल आणि त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. मित्र आणि नातेवाईक भेटतील. छोटया प्रावसाचे बेत आखाल. भाग्योदय होईल. आणि प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
मीन:-
श्रीगणेश आपणाला आज खर्चावर संयम ठेवण्याची सूचना देत आहेत. संताप आणि वाणीवर संयम ठेवा. कोणाशीही मतभेद अथवा गैरसमज होतील असे ग्रहयोग आहेत. विशेषतः पैशाच्या देवाण- घेवाणी संबंधी सावध राहा. आप्तस्वकीयांशी वाद होतील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य साधारणच राहील. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा