पती-पत्नी मध्ये घरगुती वाद,पत्नी गेली माहेरी, सोबत घेवून आली वडील, काका आणि भाऊ अन् जावयासोबत जे घडलं ते भयंकर

Spread the love

ठाणे:- जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये भयंकर घटना घडली आहे. सासरी नांदायला का घेऊन जात नाही, याचा जाब विचारण्यासाठी आलेली तरुणी, तिचे वडील, काका आणि भावाने तरुणावर वार केले.यात त्याच्या डोक्याला आणि गुप्तांगाला दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीसह तिच्या वडिलांना अटक केली आहे. या घटनेबाबत पोलिसांनीबुधवारी माहिती दिली. त्यानुसार अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली.

जखमी तरुणावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तरूण आणि आरोपी महिलेचे लग्न १० वर्षांपूर्वी झाले होते. अंबरनाथमधील कमलाकर नगर परिसरात ते राहत होते. त्यांच्यात कौटुंबिक वाद होऊ लागले. त्यानंतर दोघेही वेगळे राहू लागले. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास पत्नीसह सासरे, चुलत सासरे आणि मेहुणा त्याच्या घरी आले. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली.

बाचाबाचीचं पर्यावसन हाणामारीत झाले. पत्नी, चुलत सासऱ्यांनी तरुणावर सळई आणि धारदार शस्त्राने वार केले, असा आरोप पीडित तरुणाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्यावर आणि गुप्तांगावर जखमा झाल्या आहेत. त्याला तातडीने कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेनंतर तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार