पाल ता रावेर वार्ताहर:- दि 1/10/2023 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित उत्तर महाराष्ट्र पातळीवरील पत्रकार कार्यशाळा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ विशाल पाटील यांना जळगाव येथे महाराष्ट्र स्तरीय वैद्यकीय सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला यावेळी उद्घाटक म्हणून पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील , पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे होते.
विशेष अतिथी म्हणून महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार यदु जोशी, मंत्रालय, विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, प्रदेश सरचिटणीस विश्वास अरोटे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे,मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष दिगंबर उपस्थित होते
डॉ विशाल पाटील यांनी सातपुड्याच्या अति दुर्गम भागात आदिवासी गोर गरीब रुंगणाना मागील बारा वर्षापासून निरंतर चोवीस तास वैद्यकीय सेवा देत असून या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात.आले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक सपकाळे,प्रमोद सोनवणे, भगवान मराठे, संतोष नवले,नागराज पाटील संजय चौधरी,भूषण महाजन, जयंतीलाल वानखेडे,योगेश सैतवाल, प्रा. विजय गाढे, मिलिंद सोनवणे,गोपाल सोनवणे, रोहन पाटील यांनी प्रयत्न केले.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५