बहादरपुर परिसरातून सर्रास अवैध वाळू वाहतूक तीन गावांच्या सरपंचांनी दिले तहसीलदारांना निवेदन

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी पारोळा

पारोळा :- तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक ही बिनधास्तपणे सुरू आहे. या अवैध वाळू वाहतूक दारांवर महसूल चे नियंत्रण नसल्याने शासनाचे रोजचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. परिणामी बहादरपुर महाळपुर, शिरसोदे या गावातील तिन्ही सरपंच यांनी तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून प्रतिबंध करण्याची मागणी केली आहे. तालुक्यात बोरी नदीपात्रात सात ते आठ ठिकाणी वाळू लिलाव चे ठिकाणे आहेत. या एक ही ठिकाणाचा वाळू लिलाव हा सात आठ वर्षापासून झालेला नाही. त्यामुळे बोरी नदीपात्रात हजारो ब्रास वाळू ही कागदावर शिल्लक असल्याचा अहवाल प्रशासनाकडे दिसून येतो. तर दुसरीकडे बाहदरपुर, शिरसोदे, महाळपूर या गावालगत असलेल्या बोरी नदीपात्रातून दिवस-रात्र ट्रॅक्टर, डंपर, रिक्शा यातून बिनधास्त अवैध वाळू वाहतूक करून शासनाचे लाखो रुपयाची खनिजा ची चोरी केली जात आहे.

त्यावर तलाठी, मंडळ अधिकारी, भरारी पथक आदींचे कोणताच वचक नसून कारवाई होत नसल्याने अवैध वाळू वाहतुक रोज वाढत आहे. भविष्यातील पाणी टंचाई आणि इतर अडचणी पाहता या ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्य ग्रामस्थांनी एकीने एकत्र येत तहसीलदार ए बी गवांदे यांना या अवैध वाळू वाहतुकीचे निवेदन देऊन तात्काळ कारवाई सहा प्रतिबंधक करण्याची मागणी केली आहे. या अवैध वाळू वाहतूक कडे महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने शासनाने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होता आहे परिणामी तातडीने या संदर्भात उपाय योजना करण्यात यावा व कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच भिकन पारधी, सरपंच बापू सैदाने, सुधाकर पाटील, सह माजी सरपंच गोकुळ चौधरी, सदस्य परेश चौधरी व ग्रामस्थांनी तहसिलदारांना निवेदन देतेवेळी केली आहे.

टीम झुंजार