पारोळा शहरात साकारणार मेडीकल असोसिएशनची अद्ययावत वास्तु,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांचे हस्ते भुमीपुजन संपन्न.

Spread the love

पारोळा : – दि.२५ सप्टेबर २०२३ रोजी पारोळा तालुका मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांनी इतर शहरांप्रमाणे पारोळा शहरात देखील मेडीकल असोसिएशनची हक्काची वास्तु साकारण्यात यावी, या मागणी जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांची भेट घेतली होती.

या भेटी वेळी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या माध्यमातुन लवकरच आपणांस केमिस्ट भवन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे मा.अमोलदादा पाटील यांनी ठोस आश्वासित केले होते. त्याची वचनपुर्ती म्हणुन आज दि.०५ नोव्हेंबर रोजी मा.अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतुन पारोळा मेडीकल असोसिएशनच्या अद्ययावत वास्तु बांधकामाचा भव्य भुमीपुजन सोहळा मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, मा.नगराध्यक्ष सुरेंद्रभाऊ बोहरा, मा.नगरसेवक मनिष पाटील यांचेसह पारोळा तालुका मेडीकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य व पारोळा तालुक्यातील औषध विक्रेते उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार