गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत खूप वाढ झाली आहे. सध्या रिव्होल्ट मोटर्सची इलेक्ट्रिक बाईक RV400 ची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.
नवी दिल्ली – पेट्रोल डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्यानंतर भारतातील अनेक नागरिकांनी इलेक्ट्रिक दुचाकीस पसंती दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत खूप वाढ झाली आहे. सध्या रिव्होल्ट मोटर्सची इलेक्ट्रिक बाईक RV400 ची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. प्रत्येक वेळी या बाईकचे बुकिंग सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच बुकिंग बंद होते.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या बाईकमध्ये एवढं काय खास आहे की, तिची इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी होतेय? यामागचं कारणही तसचं आहे. या बाईकचे मायलेज खूपच मस्त आहे. आज आम्ही तुम्हाला रिवॉल्ट 400 बाइक विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.
बाईकमध्ये काय आहे खास?
Revolt RV 400 इलेक्ट्रिक बाइकच्या फीचर्सबद्दल सांगायचं झाल्यास ही बाईक एकदा चार्ज केली तर तब्बल 156 किमी चालते. बाईकचे टॉप स्पीड ताशी 85 किमी इतकं आहे. कंपनीने यात 3.24 किलोवॅट क्षमतेची बॅटरी दिली असून या बॅटरीसह कंपनीकडून 1,50,000 किलोमीटरची वॉरंटी देण्यात आली आहे. यामध्ये आपणास Eco, Normal आणि Sports असे तीन रायडिंग मोड्स मिळतील. या बाईकमधील लिथियम आयन बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी एकूण साडेचार तास लागतात.
फक्त 15 पैशात 1 किमीपर्यंत चालते.
कंपनीने या इलेक्ट्रिक बाइक मध्ये 3.24 किलोवॅटची बॅटरी दिली आहे. एक किलोवॅटची बॅटरीला चार्ज करण्यासाठी साधारणत: एक यूनिट वीजेचा खर्च येतो. जर 1 यूनिटची किंमत 7 रुपये पकडल्यास, बॅटरी फुल चार्ज करण्यास जवळपास 23 रुपये खर्च येईल. याचाच अर्थ बाइकचा प्रति किमी खर्च फक्त 15 पैसे होईल. चांगलं माइलेज आणि भन्नाट फिचर्स यामुळेच ही बाइक ग्राहकांमध्ये खूपच पॉप्यूलर आहे.
किंमत किती?
Revolt RV 400 ची दिल्ली एक्स-शोरूम किंमत आधी 1 लाख 18 हजार 999 इतकी होती. पण आता किंमतीत कपात झाल्याने या बाइकची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 90 हजार 799 रुपये झाली आहे. तर, अन्य शहरांमध्ये या बाइकची किंमत 1 लाख 6 हजार 999 रुपये इतकी आहे. म्हणजे, दिल्लीमध्ये ही बाइक सर्वात स्वस्त झालीये. कंपनीने बाइकच्या किंमतीत 28,200 रुपयांची कपात केली आहे. तर, Revolt RV 300 च्या किंमतीत नेमकी किती कपात झाली आहे, याबाबत अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही.