तिच्या इच्छेविरुद्ध झाले लग्न, लग्नापूर्वी होते प्रेमसंबंध, नवरा ठरत होता अडसर, पुढे काय झालं वाचा.

Spread the love

लखनौ (उत्तर प्रदेश): गाझीपूरच्या खानपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सिधौनाजवळ 29 सप्टेंबर रोजी भर दिवसा एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणाचा तपास करत पोलिसांनी पत्नीसह तीन आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे.अनैतिक संबंधातून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या नवऱ्याची हत्या केल्याचे कबूल केले आहे. लग्न तिच्या इच्छेविरुद्ध करण्यात आल्याचे तिने तपासादरम्यान सांगितले.

पोलिस अधीक्षक ओमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ’29 सप्टेंबर रोजी मोबाइल विक्रेते स्वतंत्र भारती यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येसंबंधी स्वतंत्र भारती यांची पत्नी कांचन गिरी हिच्यावर संशय असल्याने पोलिसांनी तिची चौकशी करत असताना तिने गुन्हा कबूल केला. मृताची पत्नी कांचन गिरी हिचे लग्नापूर्वी वीरू नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते आणि मार्चमध्ये कुटुंबाच्या दबावाखाली कांचनचा विवाह स्वतंत्र भारती यांच्याशी करण्यात आला.

कांचन या लग्नाने खूश नव्हती आणि यादरम्यान ती वीरू आणि त्याच्या मित्रांशी संपर्कात होती.’कांचन हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘घटनेच्या दिवशी नवऱ्याने दुकान बंद केल्यानंतर मित्राजवळ ठेवलेले चॉकलेट आणण्यासाठी पाठवले. मात्र, रस्त्यातच वीरू आणि त्याचे दोन मित्र गोविंद यादव आणि गामा बिंद यांनी मिळून स्वतंत्रवर गोळीबार केला व फरार झाले होते.’

पोलिसांनी कांचनसह स्वतंत्र भारती यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या गोविंद यादव आणि गामा बिंद या दोन मारेकऱ्यांसह ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी वीरू यादवचा शोध सुरू आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली होंडा शाइन दुचाकी, पिस्तुल आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पत्नीसह तीन आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार