आजचे राशी भविष्य रविवार १२ नोहेंबर २०२३

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:

आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल असे श्रीगणेश सांगतात. धनलाभाचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. वैचारिक दृष्ट्या उत्साह वाटेल. समाधानकारी व्यवहारांपासून अधिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ:

दिवस खूप आनंदात जाईल असे गणेश सांगतात. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत नियोजनानुसार पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. माहेरहून आनंदाच्या बातम्या येतील. तसेच लाभही होईल. रूग्ण व्यक्तींची तब्बेत सुधारेल सहकार्‍यांकडून लाभ होईल.

मिथुन:

जीवनसाथी आणि संतती यांच्या आरोग्याविषयी विशेष लक्ष पुरविण्याची पूर्वसूचना श्रीगणेश देत आहेत. वाद-विवाद आणि बौद्धिक चर्चेपासून दूर राहा. अपमान होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पोटाच्या तक्रारी त्रास देतील. नव्या कार्याचा आरंभ निष्फळ ठरण्याची शक्यता आहे. प्रवासाचे बेत ठरवू नका.

कर्क:

ग्लानीमुळे आज आपले मन दुःखी राहील असे श्रीगणेश सांगतात. प्रफुल्लता, स्फूर्ती आणि आनंद यांचा अभाव राहील. कुटुंबीयांशी तक्रारी वाढतील. पैसा खर्च होईल आणि कामात अपयश येईल. वेळेवर भोजन मिळणार नाही. निद्रानाश त्रास देईल. छातीच्या विकारांचा त्रास जाणवेल.

सिंह:

श्रीगणेशकृपेने आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. भावंडाबरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधांमधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य पर्यटनस्थळी सहलीला जाण्याचे ठरवाल. मानसिक दृष्टया चिंतामुक्त व्हाल. कार्य़ यशस्वी होईल.

कन्या:

आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील असे श्रीगणेश सांगतात. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. तब्बेत चांगली राहील. कोणाशी बौद्धिक चर्चा करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. गोडधोड जेवणाचा आस्वाद घ्याल. प्रवास होतील. नाहक खर्च आवरा. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काळ कठिण आहे.

तूळ:

श्रीगणेश सांगतात की आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थित कराल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक आणि मानसिकदृष्टया स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. आनंद, हर्ष आणि मनोरंजनावर पैसा खर्च कराल.

वृश्चिक:

आपल्या स्वभावातील तामसवृत्ती आणि बोलणे यावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक शैथिल्य आणि मानसिक चिंता यांमुळे मन ग्रासून जाईल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्या. शक्य असेल तर आज शस्त्रक्रिया करू नका. स्नेही आणि कुटुंबीयांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहा किंवा शक्य असेल तर लांबणीवर टाळा. आनंद- उल्हास यावर खर्च कराल.

धनु:

आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. मित्र आणि परिवारासह पर्यटन स्थळी भटकण्याचा आनंद मिळेल. व्यापारात लाभदायी ठरणारा दिवस. कुटुंबात सुखशांती नांदेल. विवाह इच्छुकांना योग्य साथीदार मिळण्याचे योग आहेत.

मकर:

कुटुंब आणि संतती यांच्याविषयी आपणाला आनंद आणि समाधान वाटेल. स्नेही व मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यापारात पैशाच्या वसुलीसाठी बाहेर जावे लागेल आणि ते फायदेशीर ठरेल. व्यवसायात धन आणि मान- प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. व्यवसायात बढतीची शक्यता आहे. अपघात होण्यापासून सावध राहा.

कुंभ:

प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक अस्वास्थ्य राहील. शैथिल्य आणि आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायात वरिष्ठांशी काम करताना सांभाळून राहा. आनंद- मौजमजा यासाठी पैसा खर्च होईल. संतती विषयक काळजी राहील. विदेशातून वार्ता प्राप्त होतील.

मीन:-

आज अनैतिक कामात न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. क्रोध आणि वाणीवर संयम ठेवा. आरोग्या विषयी दक्ष राहा. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहा. तब्बेतीच्या देखभालीसाठी पैसा खर्च करावा लागेल. मानसिक बेचैनी जाणवेल. घरातील व्यक्तींशी असणार्‍या संबंधात नकारात्मकता येऊ देऊ नका. इष्टदेवतेचे जप, ध्यान आणि त्यावरची निष्ठा आपणाला योग्य दिशा दाखवेल.

हे पण वाचा

टीम झुंजार