झुंजार प्रतिनिधी। एरंडोल
एरंडोल :- येथे दिनांक 21 मार्च रोजी शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यात यावी यासाठी शिवसेना कार्यालय येथे एरंडोल शहर शिवसेना व शिवप्रेमी नागरिकांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहर प्रमुख कुणाल महाजन, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य आनंदा चौधरी(भगत), उपशहर प्रमुख सुनील मराठे,युवा सेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीला अमर साळी, पिंटू मिस्त्री,चंदू जोहरी,कृष्णा ओतरी,कृनाल पाटील,परेश बिर्ला,अमोल भावसार यांचेसह अनेक शिवसैनिक या वेळी उपस्थित होते.
दि 20 मार्च रोजी तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पारोळा येथे होणाऱ्या कृषी रत्न पुरस्कार सोहळा व शेतकरी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.
तसेच दि 21 मार्च रोजी तिथीप्रमाणे साजरी होणाऱ्या शिवजयंती उत्सव हा मोठ्या धुमधडाक्यात व वाजत गाजत साजरी करण्याचे ठरवण्यात आले.
सकाळी नऊ वाजता होळी मैदान येथून मोटर सायकल रॅली काढून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता गांधीपुरा येथे क्षत्रिय सूर्यवंशी मराठा समाज मंडळाच्यावतीने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता एरंडोल शहर शिवसेना व शिवप्रेमी नागरिकांकडून सजीव आरास असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी सर्व शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिकांनी सायंकाळी पाच वाजता मरीमाता मंदिराजवळ जमावे व मिरवणूकीत सहभागी व्हावे असे अवाहन समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, अध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, शहर प्रमुख कुणाल महाजन, सुभाष मराठे, सुनील चौधरी, अतुल महाजन यांच्यातर्फे करण्यात आले आहे. असे अवाहन