प्रतिनिधी l पारोळा
शहरातील शिवसेनेचे माजी नगरसेविका यांच्या निवासस्थानाला आज रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची भीषण पाहता पारोळा, अमळनेर एरंडोल येथील अग्निशमन बंब मागविण्यात आले होते. रात्री उशीरा पर्यंत आग विझवण्याचे काम हे सुरू होते.
मोरफळ गल्लीमधील रहिवासी मनोज जगदाळे यांचे गजानन इलेक्ट्रॉनिक्स हे भव्य शोरूम आहे. त्या शोरूमचे गोडाऊन व निवासस्थान हे जगदाळे यांचे एकच आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कालच त्यांच्याकडे नवा एसी, फ्रिज, आदी इलेक्ट्रॉनिक माल साहित्य हे आणण्यात आले होते. आज रात्री अचानक पावणे नऊ वाजेच्या सुमारास निवासस्थान खालील गोडाऊनला आचनक आग लागली. सौम्य रूप असलेला आगिने नंतर मात्र भयानक असे रुद्र अवतार धारण केले. त्यात एसी, फ्रिज यांच्या गॅस हंडी या एका मागून एक फुटत गेल्याने आग ही मोठ्या प्रमाणात पसरू लागली त्यावेळी वरच्या मजल्यावर मनोज जगदाळे यांचे लहान बंधू आण्णा जगदाळे यांच्या पत्नी यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी आरडाओरडा केली. शेजारी व गल्लीत नागरिकांनी धावपळ सुरू केली.

तोपर्यंत आगीने अतिशय भयानक असे उग्ररूप धारण केले होते. अतिशय निमुळती अशी गल्ली असल्याकारणाने अग्निशमन येण्यास उशीर होत गेला. पारोळा नगरपालिकेच्या अग्निशमन बंब अमळनेर, एरंडोल पालिकेचा अग्निशमन बंब तसेच संदेश कृषी सेवा केंद्राची टँकरच्या साह्याने आग विजविण्याचे आटोकाट प्रयत्न हे उशिरा पर्यंत सुरू होते. यावेळी बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

आगीचे गांभीर्य पाहता डी वाय एस पी सुनील नंदनवाळकर सह पोलिस निरीक्षक सुनील पवार सह विविध राजकीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठीच गर्दी यावेळी केली होती. आग नेमकी कशामुळे लागली हे कारण समजू शकले नाही. तसेच अचूक किती नुकसान झाले त्याची माहिती मिळू शकली नाही.इलेक्ट्रॉनिक वस्तू सह संसार उपयोगी सर्व साहित्य या आगीत जळाले आहे. तीन मजली इमारत मुळे आग विजविण्याचे काम हे सुरूच होते.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……