जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
श्रीगणेश म्हणतात की आज आपणाला आध्यात्मिक दृष्टीने एक वेगळा अनुभव देणारा दिवस आहे. गूढ आणि रहस्यमय विद्या आणि त्यांसंबंधी गोष्टी यांचे आकर्षण राहील. आज आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होण्याचा योग आहे. वाणी व द्वेष भावना यांवर आवर घाला. नवीन कार्यारंभ करू नका. शक्यतो प्रवास स्थगित करा.
वृषभ:
श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुखांचा अनुभव घ्याल. घरातील सदस्य आणि निकटवर्गीयांबरोबर प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. त्याचबरोबर छोटया प्रवासाचे बेत आखाल. परदेशात राहण्यार्या संबंधिताकडून वार्ता येतील. त्यामुळे मनाला आनंद होईल. अचानकपणे लक्ष्मीची कृपा आपणावर होऊ शकते.
मिथुन:
आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी जाईल असे श्रीगणेशांना सूचित करायचे आहे. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस जातील आणि त्यामुळे आपणांस यश व कीर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. पण केलेला खर्च वाया जाणार नाही. शरीर स्वास्थ्य चांगले राहील. स्वभावात रागाचे प्रमाण मात्र वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
कर्क:
आपण शांततेत आजचा दिवस घालवा असा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल. पोटदुखीचा विकार बळावेल. मानसिकदृष्टया चिंता आणि उद्वेग राहील. अचानक खर्च वाढतील. वादविवाद टाळा. प्रवास आणि नवीन कार्याचा आरंभ करू नका.

सिंह:
श्रीगणेश सांगतात की आज आपण शारीरिक दृष्टया अस्वस्थ आणि मानसिक दृष्टया दुःखी राहाल. घरातील व्यक्तींबरोबर मतभेद होतील. गैरसमज वाढतील आणि मन उदास राहील. आईशी मतभेद राहतील आणि तिच्या तब्बेतीची काळजी राहील. सरकारी आणि मालमत्तेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही शिक्का देताना सावधानता बाळगा.
कन्या:
कोणत्याही कामात विचारपूर्वक पाऊल टाकण्याची सूचना श्रीगणेश देतात. भाऊ बहिणींशी प्रेमाचे संबंध बनून राहील. मित्र आणि स्वकीयांशी सुसंवाद घडतील. प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता. आर्थिक लाभही होतील. समाजात मान- सन्मान प्राप्त होतील.
तूळ:
श्रीगणेश सांगतात की आज आपले मनोबल कमी राहील. त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल. नवीन काम किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नका. घरातील व्यक्तींशी वादविवाद होणार नाहीत. यासाठी जिभेवर संयम ठेवा. हट्टीपणा सोडून समाधानकारक मार्ग स्वीकारण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.
वृश्चिक:
आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरातील व्यक्तींसमवेत दिवस आनंदात घालवाल. स्वकीयांकडून भेटवस्तू प्राप्त होतील. आनंदी वार्ता समजतील आणि प्रवास आनंददायक होतील.

धनु:
श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणासाठी समस्यापूर्ण राहील. कुटुंबीयांशी चर्चा होईल व दुःखी व्हाल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. मनाचा अतिउत्साह आवरावा लागेल. अपघातापासून सावध राहा. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. पैसा खर्च होईल.
मकर:
मित्र आणि संबंधितांशी भेट झाल्याने दिवस आनंदात जाईल. सामाजिक क्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रातही आजचा दिवस आपणाला लाभदायक आहे. विवाहोत्सुकांना जीवनसाथी अगदी सहज निवडता येईल. प्रवास- सहलीचे योग आहेत. घरात एखादे शुभकार्य घडेल असे श्रीगणेशांना वाटते.
कुंभ:
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. आज प्रत्येक कामात सहज यश मिळेल. मनःस्थिती आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे बढती मिळेल. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. धनप्राप्ती होईल. गृहस्थी जीवनात आनंद मिळेल.
मीन:-
मनातील दुःख आणि अशांतता याने दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांबरोबर सांभाळून कार्य करण्याची सूचना श्रीगणेश देतात. संतती विषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. पोटाची तक्रार राहील. दैव प्रतिकूल आहे असे वाटेल. मनात येणारे नकारात्मक विचार मनाचा कब्जा करणार नाहीत याची काळजी घ्या.
हे पण वाचा
- धक्कादायक! एका व्यक्तीने आपल्या जिवंत पत्नीला सरकारी कागदपत्रांमध्ये मृत दाखवून प्रेयसीशी केलं लग्न.
- संतापजनक!19 वर्षीय नराधम तरुणाने विवाहित महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी,नकार देताच कटरने केले 15 वार 280 टाके टाकून,गोधडीवानी शिवले पीडितेचे अंग.
- आईनं नशा करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे २७ वर्षीय उच्चशिक्षित मुलाने १३ दुचाकी पेटवून दिल्या; माथेफिरू नशेखोर मुलास अटक.
- अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सावदा पोलिसांच्या छापा, 60 किलो मांस जप्त, एक जणांवर गुन्हा दाखल
- आज रविवार रोजी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’चे आयोजन.. राज्यभरातून विविध मान्यवरांची व संविधान प्रेमीची राहणार उपस्थिती.