जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
आज तुम्हाला श्रीगणेश रागावर ताबा ठेवण्याचा सल्ला देत आहेत. जर तुम्ही रागावर ताबा ठेवला नाही तर काम आणि चांगल्या संबंधात बिघाड येईल. मानसिक व्यग्रता आणि मनाची बेचैनी यामुळे तुमचे कामात लक्ष लागणार नाही. प्रकृती स्वास्थ्य नरमच असेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगल प्रसंगी हजर राहण्याचे आमंत्रण मिळेल.
वृषभ:
शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळायला उशीर लागेल व त्यामुळे निराश व्हाल. नवीन काम सुरू करू नका. योग्य अयोग्य बघूनच खाणे पिणे ठेवा. आज कामाचा व्याप वाढेल. शिथिलता राहील. प्रवासात विघ्ने येतील. एखाद्या कामाच्या मागे लागून सुख शांती गमावून बसण्यापेक्षा योग, ध्यान, आध्यात्मिकता यात मन गुंतवा.
मिथुन:
श्रीगणेशजी सांगतात की तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्या बरोबर एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्वादिष्ट भोजन मिळेल. नव्या कपड्यांची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. तुमच्या मान- सन्मानात व लोकप्रियतेत वाढ होईल.
कर्क:
श्रीगणेश म्हणतात की व्यवसाय-धंद्यात आज फायदा होईल. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांचा आज तुमच्या बरोबरचा वेळ खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शत्रूवर विजय मिळेल. चालू कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल.

सिंह:
श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस नवनिर्माण व कला यासाठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांनाही अभ्यासात प्रगतीचा. स्नेही, मित्र यांच्या गाठीभेटी होतील. तब्येत चांगली राहील. तरीही रागावर नियंत्रण ठेवा. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकेल.
कन्या:
आजचा दिवस प्रतिकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नी बरोबर भांडण होईल किंवा मतभेद होतील. आईच्या तब्येतीची काळजी लागेल. स्थावर संपत्तीच्या कामात सावध राहा.
तूळ:
आजचा दिवस आनंदात जाईल असे श्रीगणेश सांगतात. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी असेल. धार्मिक प्रवासाने मनाला आनंद मिळेल. आपापसातील संबंध सुधारतील.
वृश्चिक:
आपल्या कुटुंबात जर सुखी वातावरण हवे असेल तर वाणीवर संयम ठेवा. असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. आपल्या वागण्यापातून कोणाचे मन दुखावले जाईल. म्हणून वर्तन सुद्धा संयमित ठेवा. नकारात्मक दृष्टीकोन निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्या. स्वास्थ्य बिघडेल, मन उद्विग्न होईल. विद्यार्जनामध्ये विद्यार्थ्यांना अडथळा येईल.

धनु:
निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील असे श्रीगणेश सांगतात. लक्ष्मीची कृपा राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपणाला आनंदी ठेवेल. यात्रेच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास कराल. आपली माणसे भेटल्याचा आनंद होईल. निकटवर्गीयांकडे शुभ प्रसंगानिमित्त हजेरी लावाल. यश-कीर्ती वाढीस लागेल.
मकर:
आज मन अस्वस्थ राहील असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी खर्च होईल. स्वकीय आणि मित्रांबरोबर पटणार नाही. धनहानी आणि मानहानीची शक्यता आहे. आज आध्यात्मिकतेकडे जास्त कल राहील. कोर्ट- कचेरीच्या कामात अपयश येईल. वाणीवर ताबा ठेवा.
कुंभ:
आज आपणांस मिळणार्या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल असे श्रीगणेश सांगतात. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे. व्यापारी वर्गाला व्यापारात फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल. संततीबरोबर चांगले संबंध राहतील. उत्पन्न वाढेल. प्रवासाचा बेत आखाल.
मीन:-
श्रीगणेश आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी सांगतात. नोकरी व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी आपणावर खुश राहतील. त्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. वयस्कर आणि वडील यांचेकडून लाभ होईल. कौटुंबिक आनंदामुळे आपण आनंदी राहाल.
हे पण वाचा
- धक्कादायक! एका व्यक्तीने आपल्या जिवंत पत्नीला सरकारी कागदपत्रांमध्ये मृत दाखवून प्रेयसीशी केलं लग्न.
- संतापजनक!19 वर्षीय नराधम तरुणाने विवाहित महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी,नकार देताच कटरने केले 15 वार 280 टाके टाकून,गोधडीवानी शिवले पीडितेचे अंग.
- आईनं नशा करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे २७ वर्षीय उच्चशिक्षित मुलाने १३ दुचाकी पेटवून दिल्या; माथेफिरू नशेखोर मुलास अटक.
- अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सावदा पोलिसांच्या छापा, 60 किलो मांस जप्त, एक जणांवर गुन्हा दाखल
- आज रविवार रोजी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’चे आयोजन.. राज्यभरातून विविध मान्यवरांची व संविधान प्रेमीची राहणार उपस्थिती.