एरंडोल :- अंजनी प्रकल्पातून रब्बी हंगामातील हरबरा पिकासाठी २२डिसेंबरला पाण्याची दोन आवर्तने सोडणार असून याचा लाभ परिसरातील शेकऱ्यांनी घ्यावा अशे आवाहन अंजनी प्रकल्पाचे उप अभियंता एस पी चौव्हान यांनी केले असून माजी नगरअध्यक्ष देविदास महाजन यांनी केलेल्या या मागणीस उप अभियंता यांनी हिरवा कंदील दिल्यामुळे शेतकऱ्यां मध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे
अंजनी धरण या वर्षी १०० टके भरल्यामुळे रब्बी हंगामासाठी अंजनी प्रकल्पातून डाव्या उजव्या कालव्याद्वारे काळ्या बंधाऱ्यांतून नंदगाव भालगांव तुईसाड परिसरातील लाभ धारक शेतकर्यांना निदान हरबरा पिकासाठी तरी पाण्याची दोन आवर्तने सोडावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांनी अंजनी प्रकल्पाचे उप अभियंता यांना निवेदनाद्वारे केली होती
निवेदनच्या प्रती पालकमंत्री,गुलाबराव पाटील आमदार चिमणराव पाटील तसेच गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता यांना देखील पाठविण्यांत आल्या होत्या तसेच या कामी माजी नसगराध्यक्ष महाजन यांचे सात्यत्याने प्रयत्न सुरु होते अखेर अंजनी प्रकल्पाचे उपअभियंता चौवान यांनी महाजन यांच्या मागणीस हिरवा कंदील दिल्यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे त्यांमुळे शेतकऱ्यां तर्फे माजी नगराध्यक्ष महाजन यांना धन्यवाद देण्यांत येत आहे
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५