मुबंई – (प्रतिनिधी) – आज दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या राज्य कोअर कमेटीची बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू)ची संघटन बांधणी करण्यात येत आहे. मासु विद्यार्थी संघटना महाराष्ट्रभर तळागळातील सर्वसामान्य विद्यार्थांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी एक अराजकीय संघटना आहे. विद्यार्थी हित हेच एकमेव मासूचे अंतिम ध्येय आहे.
आज विविध ठिकाणी शिक्षणासाठी लाखो रुपये विद्यार्थ्यांना भरावे लागतात, व तरी सुद्धा तळागळातील सर्वसामान्य विद्यार्थांना समाधान कारक योग्य शिक्षण मिळत नाही. तर हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी मासू कार्यरत आहे. आज विद्यार्थी हित लक्षात घेत मुंबई येथे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची बैठक घेऊन संघटन बांधणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र स्टूडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे, राज्यध्यक्ष ॲड. सुनिल देवरे,उपाध्यक्ष ॲड. पुजा ताळे उपस्थित होते यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्यात.
यावेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अरुण एस. चव्हाण जिल्हा सचिव प्रथमेश मराठे,झेद पटेल महानगर अध्यक्ष उदय पाटील, कृष्णा राजपूत विद्यापीठ कमिटी प्रविण देशमुख, सुभाष पाटील,प्रविण शिंदे,ऋतिक महाले, कारण शिंदे,पृथ्वी महाराज विविध प्रशाळेतील विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा