मुंबई :- कुर्ल्यातून एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. कुर्ल्यात सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. या महिलेचा गळा आवळून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलायं.
मुंबईतील कुर्ला येथे रविवारी (19 नोव्हेंबर) सकाळी सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आलाय. तसंच या महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर नजीकच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
सुटकेस बघून आला संशय :
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या दरम्यान सीएसटी रोडजवळील पुलाखालून एक व्यक्ती पायी जात असताना त्याला पुलाखाली एक सुटकेस दिसलं होतं. या सुटकेसबाबत संशय आल्यानं त्यानं लगेच यासंबंधीत माहिती पोलिसांना दिली. सदरील प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या सुटकेसची तपासणी केली. पोलिसांना सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला. सुटकेसमध्ये आढळलेला मृतदेह हा 20 ते 25 वर्षांच्या महिलेचा असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस अधिकारी काय म्हणाले :
या संदर्भात एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेनं टीशर्ट आणि ट्रॅक पॅन्ट परिधान केलेली होती. प्रथमदर्शनी, लैंगिक अत्याचाराची कोणतीही चिन्हं आढळून आली नाहीत. तसंच महिलेच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसून आल्या नाहीत.
पोलिसांकडून तपास सुरू :
या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आलाय. तसंच ज्या भागात सुटकेस सापडली त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. कुर्ला पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेनेही या प्रकरणी तपास सुरू केलाय. तसंच मृत महिलेची ओळख पटावी यासाठी अधिकारी सर्व पोलीस ठाण्यातून बेपत्ता महिलांची माहिती गोळा करत आहे. दरम्यान,महिलेचामृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा