जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
आज आपणावर लक्ष्मीची कृपादृश्टी राहील असे गणेशजी सांगतात. विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होतील. सहलीचे नियोजन कराल. दुपारनंतर मात्र मानसिक एकाग्रता राहणार नाही. तब्बेत बिघडेल. स्वकीयांशी मतभेद होतील. जपून राहा. पैसा खर्च होईल.
वृषभ:
सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्त व्हाल व गणेशजींचा आशीर्वाद आपणाला आहे. तब्बेतही छान राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधानचा अनुभव घ्याल. व्यवसाय धंद्यात यश मिळेल. कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ आपणांवर प्रसन्न राहतील. दुपारनंतर नवीन कामाचे नियोजन कराल. व्यापारात फायदा होईल. पत्नी आणि मुलाकडून लाभ होईल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल.
मिथुन:
संमिश्र फलदायी दिवस जाईल असे गणेशजी सांगतात. तब्बेतीत चढ-उतार होतील. व्यवसाय- नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नाखूष राहतील, त्यामुळे त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. दुपारनंतर कार्यात यश दृष्टिक्षेपात आल्याने मनाला आनंद वाटेल. व्यापारात वातावरण अनुकूल राहील. वडीलधार्यांच्या आशीर्वादाने तुमचे कार्य तडीला जाईल. व्यवसायात बढतीचे योग आहेत. धन मिळेल.
कर्क:
आज मन शांत आणि आनंदी राहण्यासाठी ईश्वराचा नाम जप आणि आध्यात्मिक वाचन हाच एकमेव उपाय असल्याचे गणेशजी सांगतात. रागाला आवर घाला. अनैतिक कृत्ये आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा. पैशाची चणचण भासेल. दुपारनंतर मात्र तब्बेत चांगली राहील. आणि मनःस्वास्थ्य मिळेल. आनंदप्राप्तीसाठी खर्च होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठापासून जपून राहा. परदेशातून नातेवाईकांच्या वार्ता मिळतील. कोणाशी वादविवाद किंवा मतभेद टाळण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत.
सिंह:
आज आपणाला मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील असे गणेशजी सांगतात. मित्र आणि स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीचा आनंद लुटाल. दुपारनंतर मात्र खूप विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. संतापामुळे कार्ये बिघडतील, पण बोलण्यावर संयम ठेवून परिस्थिति सांभाळू शकाल. पैशाची चणचण भासेल.
कन्या:
गणेशजी सांगतात की आजचा दिवस आपणाला शुभ जाईल. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्टया आपण तरतरीत व प्रफुल्लित राहाल. भावनावश होऊन वाहवत जाऊ नका. दुपारनंतर दिवस आनंदात जाईल. धंदा व व्यापारात भागीदारांकडून लाभ होतील.
तूळ:
लेखनकार्य आणि सृजनशीलता या दृष्टिने आजचा दिवस शुभ आहे असे गणेशजी सांगतात. बौद्धिक चर्चेतून लाभ होण्याविषयी आपण विचार कराल. त्यात यशही मिळेल. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे सहकार्य चांगले मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
वृश्चिक:
आज हट्ट सोडा असे गणेशजी सुचवितात. भावनेच्या आहारी जाऊ नका. त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. आर्थिक नियोजन कराल. वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. आईकडून लाभ मिळेल. दुपारनंतर विचारात एकदम बदल होईल. नवीन काम हाती घेऊ नका. बौद्धिक आणि तार्किक कामे करा. पोटाच्या तक्रारी राहतील. यात्रा- प्रवास शक्यतो टाळा.
धनु:
आज मन उत्साहित राहील व हल्केपणा जाणवेल. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्यनिर्णय ध्याल. मित्रांशी संबंध वाढतील आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भाग्यवृद्धीचे योग आहेत. दुपारनंतर मात्र जास्त संवेदनशील बनाल. मानसिक तणाव राहील. प्रसाधनांवर स्त्री वर्गाचा खर्च होईल. घर, जमीन, वाहन इ. चा सौदा जपून करा. ज्ञानप्राप्तीच्या दृष्टिने विद्यार्थ्यांना चांगला काळ.
मकर:
आज धार्मिक विचारांबरोबर धार्मिक कार्यावरही खर्च होईल. वादविवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होऊ नये याकडे लक्ष द्या. परिवारातील सदस्यांचे मन दुखावेल व ते नाराज होतील. दुपारनंतर मनातील चिंता दूर होतील. मित्र आणि स्वजनांच्या भेटीने मन आनंदी होईल. भाग्यवृद्धीचे योग आहेत. बहीण- भावांच्या प्रेमाचा वर्षाव आपणांवर होईल असे गणेशजी सांगतात.
कुंभ:
आज आपले मन आनंदी राहील असे गणेशजी सांगतात. गहन चिंतनशक्ती आणि आध्यात्मिकता यात मन गुंतून जाईल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. उक्तीवर संयम ठेवा. अचानक उद्भवणार्या खर्चावर नियंत्रण ठेवा. निर्णय शक्तीचा अभाव राहील. आपण केलेल्या कामाकडे कोणी लक्ष न दिल्याने आपण आपले मन निराश होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील.
मीन:-
पैशाची देवाण- घेवाण, जुनी येणी तसेच गुंतवणूक करताना सावध राहा. असा संकेत श्रीगणेश देत आहेत. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात जपून राहा. वाणी आणि संतापावर नियंत्रण ठेवा. अपघाता पासून जपा. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. धार्मिक व आध्यात्मिक गोष्टींकडे मन लागेल. मित्रांकडून भेट वस्तू मिळतील. घरगुती वातावरण आनंदाचे राहील.
हे पण वाचा
- धक्कादायक! एका व्यक्तीने आपल्या जिवंत पत्नीला सरकारी कागदपत्रांमध्ये मृत दाखवून प्रेयसीशी केलं लग्न.
- संतापजनक!19 वर्षीय नराधम तरुणाने विवाहित महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी,नकार देताच कटरने केले 15 वार 280 टाके टाकून,गोधडीवानी शिवले पीडितेचे अंग.
- आईनं नशा करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे २७ वर्षीय उच्चशिक्षित मुलाने १३ दुचाकी पेटवून दिल्या; माथेफिरू नशेखोर मुलास अटक.
- अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सावदा पोलिसांच्या छापा, 60 किलो मांस जप्त, एक जणांवर गुन्हा दाखल
- आज रविवार रोजी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’चे आयोजन.. राज्यभरातून विविध मान्यवरांची व संविधान प्रेमीची राहणार उपस्थिती.