मुख्यमंत्री, कृषिमंत्री सह आ चिमणराव पाटील यांच्यावर वाढदिवस शुभेच्छा वर्षाव

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी पारोळा

पारोळा :- एरंडोल विधानसभा मतदार संघाचे शिवसेना जेष्ठ आमदार चिमणराव पाटील यांना आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तर राज्याचे कृषीमंत्री दादाभुसे यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. तर खासदार संजय राऊत, पालकमंत्री गुलाबराव पाटील सह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी, आमदार, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आदींनी फोन द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळी आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते श्री बालाजी मंदिरात अभिषेक पूजन करण्यात आला. त्यानंतर खुल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला आमदार पाटील यांनी भेट देत खेळाडू यांच्याशी हितगुज साधले.त्यानंतर त्यांनी दिवसभर निवासस्थानी विविध पदाधिकारी, आधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, कर्मचारी, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आदींनी कडून वाढदिवस शुभेच्छा स्वीकारल्या

दरम्यान आमदार चिमणराव पाटील यांच्या निवासस्थानी एरंडोल तालुक्यातील पदाधिकारी जि प सदस्य नानाभाऊ महाजन, माजी जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,प स माजी सभापती अनिल महाजन,ताडे सरपंच सचिन पाटील बाजार समितीचे माजी सभापती शालिकग्राम गायकवाड, मिलिंद पवार,आनंदा चौधरी (छोटू भगत)सकाळचे वार्ताहर आल्हाद जोशी,दिव्य मराठीचे संजय चौधरी नगरसेवक जाहिरोद्दीन शेख कासम,शकील सर,एजाज अहेमद,देशोन्नती चे कमरअली सैय्यद, यांचे सह तालुक्यातील पदाधिकारी यांनी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांना शुभेच्छा दिल्या

टीम झुंजार