पुणे : पैश्याच्या अमिषाने घरीच महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. पोलिसांनी कारवाई करून दोन पीडित महिलांची सुटका केली. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून दोघांवर गुन्हा दाखल केला. देविदास आप्पासाहेब हनवते (वय ५३, रा. वखारी, जि. जालना) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.ही कारवाई रविवारी (दि. १९) एमआयडीसी भोसरी परिसरात करण्यात आली.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी संदीप भागवत शेप यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिद देविदास हा त्याच्या राहत्या घरी पैश्याच्या अमिषाने पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता.या प्रकरणी पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी छापा टाकत पीडित दोन महिलांची सुटका केली. तसेच संशयित देविदास याला अटक केली. देविदासला साध देणाऱ्या एका महिलेसह पारधी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा