मुंबई : सोशल मीडियावर ओळख त्यानंतर मैत्री, प्रेम आणि धोका अशी अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत. पण काही प्रकरण ही एकतर्फी असतात, ज्यामध्ये एकाच खूप जास्त प्रेम असतं मात्र दुसऱ्या व्यक्तीला त्याचं जास्त काही फरक पडत नाही. एकतर्फी प्रेमी समोरील व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. त्यामुळे त्यांच्या डोक्यात केव्हा काय याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. अशातच मुंबईमध्ये एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये किन्नरने आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
नेमकं काय आहे प्रकरण?
आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतलेल्या किन्नरचं नाव अलवीना खान आहे. मुंबईतील मालवणी येथे ती वास्तव्यास होती. अलवीना हिचं एका मुलावर जीवापाड प्रेम होतं, मात्र काही दिवसांपूर्वी अलवीनाने त्या मुलाला दुसऱ्या मुलीसोबत मालाडमधील मढ येथे हातात हात फिरत असताना पाहिलं होतं. त्यानंतर अलवीनाने त्याला भेटण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो तिला भेटायचा नाही. त्याच्या अशा वागण्याने ती त्रासली होती.
कारण अनेकवेळा अलवीनाने त्याला भेटण्याचा प्रयत्न केला होता पण तो तिला काही वेळ देत नसायचा. अलवीनाने शेवटी टोकाचा निर्णय घेतला, इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या अलवीनाने व्हिडीओ रेकॉर्ड करत गळफास घेत आपलं जीवन संपवलं. सध्या मालवणी पोलिसांनी अदर अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अलवीनाचं संबंधित मुलावर एकतर्फी प्रेम होतं. या एकतर्फी प्रेमामुळे तिने आपलं जीवन संपवलं की काही दुसरं कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत.
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.