नागपूर : घटस्फोटीत महिलेला एका युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मोहित सुरेंद्र शाहु (वय २९, रा. श्रीहरीनगर, बेसा रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३० वर्षीय महिला घटस्फोटित आहे. ती कॅटरिंगचे काम करतो. मैत्रीणीच्या माध्यमातून तिची आरोपी मोहितसोबत ओळख झाली.
मोहितने तिला लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.५ एप्रिल २०२० ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान आरोपी मोहितने तिला अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या दुकानात, हॉटेल व तिच्या मानकापूर येथील घरी नेऊन तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. महिलेने लग्नाचा तगादा लावल्यानंतर आरोपी मोहितने टाळाटाळ करून लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिडीत महिलेने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी मोहितविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा