चाळीसगाव :- दिनांक 26/11/2023 रोजी रात्री 11.30 वा. सुमारास तवेरा वाहन क्र. MH 41 V 4816 वरील चालक हा अक्कलकोट येथुन मालेगांव जात असतांना कन्नड घाटात त्याचे ताब्यातील वाहनाचे समोरील काचेवर दव जमा झाले सदर वेळी वाहन चालकाने जमा झालेले दव वाहनाचा वेग कमी करुन किंवा थांबवुन पुसुन घेणे आवश्यक होत पण तसे न करता वाहन चालकाने वाहनाचा वेग कमी न करता काचेवरील दव पुसण्याचा प्रयत्न करित असतांना चालकाचे वाहनावरील ताबा सुटला त्यामुळे सदरचे वाहन खोल दरीत जवळपास 300 फूट कोसळून अपघात झाला.
सदर अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती मिळताच मा. पोलीस अधिक्षक सो. श्री. एम राजकुमार सो., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे सो. व मा. सहा. पोलीस अधिक्षक श्री अभयसिंह देशमुख सो. यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पथक तयार करण्यात आले..त्याप्रमाणे चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन, चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन, महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पाऊस चालु असतांना व सर्वत्र धुके पसरलेले असतांना सुद्धा अथक परिश्रम करुन जखमींना खोल दरीतून बाहेर काढून ,तातडीने जखमींना चाळीसगांव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले व अपघतामुळे दोन्ही बाजुने वाहने उभे राहिल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती वाहतुक सुरळीत केली.
सदर अपघतामध्ये 1.सौ.वैशाली धमेंद्र सुर्यवंशी वय 42 वर्ष 2. प्रकाश गुलाबराव शिर्के वय 68 वर्ष 3. सौ. शिलाबाई प्रकाश शिर्के वय 62 वर्ष 4. कु. पुर्वा गणेश देशमुख वय 07 वर्ष सर्व रा. मालेगांव ता. मालेगांव जि. नाशिक हे मृत पावले असून , अशांचे मृतदेह खोल दरीतुन काढुन ऍ़म्बुलंसने चाळीसगांव ग्रामीण रुग्णालय येथे रवाना केले आहेत व सदर अपघातात जखमी झालेले 1. अनुज धर्मेद्र सुर्यवंशी वय 19 वर्ष 2. चि. कृष्णा वासुदेव शिर्के वय 05 वर्ष 3. सौ.पुष्पा पुरुषोत्तम पवार वय 41 वर्ष 4. चि. सिध्देश पुरुषोत्तम पवार वय 07 वर्ष 5.सौ. रुपाली गणेश देशमुख वय 35 वर्ष. यांना रुग्णालय उपचार कामी दाखल करण्यात आले आहे …
सदर घटनेस जबाबदार वाहन चालक यांचे विरुध्द अनुज धमेंद्र सुयवंशी यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यांचा तपास मा. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये पोउपनि/कुणाल चव्हाण हे करित आहेत. सदर घटनास्थळी मा.पो.नि.सो. संदीप पाटील चाळीसगांव शहर पो.स्टे.तात्पुरता चार्ज चाळीसगांव ग्रामीण पो.स्टे., सपोनि/रुपाली पाटील महामार्ग चाळीसगांव, पोउपनि/योगेश माळी चाळीसगांव शहर, व चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन कडील सफौ/राजेंद्र साळुंखे, पोहेकाँ/संदीप पाटील, शंकर जंजाळे, नंदु परदेशी, यवुराज नाईक, भुपेश वंजारी, विजय शिंदे, ज्ञानेश्वर बडगुजर, पोना/संदीप माने, मनोज पाटील, पोकॉ/ नरेंद्र बाविस्कर चापोना/जोशी व चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन कडील पोहेकॉ/राहुल सोनवणे, नितिन वाल्हे, पोना/महेंद्र पाटील, भुषण पाटील, अमित बाविस्कर, पोकाँ/समाधान पाटील, ज्ञानेश्वर गिते व महामार्ग चाळीसगांव कडील पोहेकाँ/गणेश काळे, विरेंद्र शिसोदे, शांताराम थोरात, सुशिल पाटील, योगेश पवार, विकास खैरनार, पोना/जितेंद्र माळी, पोकाँ/ललित महाजन, गणेश पवार यांनी सर्वांनी तात्काळ मदत कार्य केले.
तसेच सदर अपघात स्थळी चाळीसगांव पोलीसांनी मदतीचे आवाहन केले असता, स्वत:चे जिवाची पर्वा न करता खोल दरित पोलीसांसोबत खाली उतरुन जखमींना वर आणण्यात मदत करणारे चाळीसगांव शहरातील वसिम चेअरमन, स्वप्निल जाधव, नवाज शेख राजु, मुज्जफर रज्जाक शहा, ईकबाल शेख निसार, फरीद खान, मुबारक खान, सलिम खान, इम्रान खाटीक, सिंकदर शेख, जुबेर खाटीक, नईम खाटीक, गोगा शेख (पहेलवान) यांचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आभार मानले तसेच त्यांचा पो.स्टे.च्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे .
यापुढे सुद्धा अपघात होताच नागरिकांनी तात्काळ पो.स्टे.ला कळवावे व जखमींना मदत करावी असे पो.स्टे.च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. सदर अपघातास मदत चालु असतांना अपघात स्थळापासुन काही अतंरावर रस्त्यावर दरड कोसळल्याने पुन्हा अपघात होवु शकतो याचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिल सर्व स्टाफने सदर रस्त्यावर कोसळलेली दरळ ही रात्रीच उचलुन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे. सदर पावसाचे वातावरण पाहता कन्नड घाटातुन जातांना वाहन चालकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी ही नम्र विनंती पो.स्टे. तर्फे करण्यात येत आहे.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५