Viral Video : एकदा पाहाच मुंबईची लोकल ट्रेन आणि त्यातील गर्दी प्रत्येक मुंबईकरांच्या आयुष्यातला एक भाग बनली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. मात्र या धकाधक्कीच्या प्रवासातही मुंबईकर प्रत्येक सण मुंबई लोकलमध्ये आनंदाने साजरा करत असतो.अशात एका मुंबई लोकलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तुळशी विवाह सोहळा लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांनी साजरा केलाय.
ऐकावं ते नवल…!
मुंबईकरांचा उत्साह आपल्याला प्रत्येक सणात दिसून येतो. या सणामध्ये मराठी माणसांपासून पर प्रांतीय व्यक्ती आनंदाने सहभाग घेतो. असाच उत्साह आपल्याला मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये होत असलेल्या तुळशी विवाहात दिसतोय. चक्क भर गर्दीत लोकलमधील प्रवाशी तुळशीचे लग्न लावत आहेत. हा व्हिडिओ लोकलमधील पुरूषांच्या डब्यातील आहे.यात लोकलचा डब्बा कागदांच्या तोरणांनी सजवला आहे. लग्नातील पद्धतीप्रमाणे आतंरपाठ पकडला आहे.
आतंरपाठाच्या दोघी बांजूनी तुळशीचे लहान रोप आहेत. तसंच ऊसाची कांडीही दिसत आहे. तसंच एक व्यक्ती मंगलाष्टके बोलत आहे. काही प्रवासी आपल्या मोबाईलमअध्ये हे कैद करत आहेत. व्हायरल व्हिडिओ हा @_aamchi_mumbai_या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहील की,तुळसी विवाह Mumbai Local Edition!.लोकलमधील प्रवाशाने आपल्या मोबाईमध्ये हा क्षण कैद केलाय. लोकल ट्रेनमधील तुळसीचे लग्नचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले आहे. एका यूजरने म्हटलं,’आपली संस्कृती जपत आहेत ‘असा प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडिओला येत आहेत
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा