एरंडोल :- नासिक जिल्ह्यातील पिंपळगाव दाभाडी येथील अल्पवयीन अदिवासी मुलीवरील अत्याचार प्रकरणातील नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच माजीमंत्री आमदार जयकुमार रावल,माजीमंत्री डॉ.हेमंत देशमुख,मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भिल विकास मंचच्यावतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
याबाबत कारवाई न केल्यास मंचतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.भिल समाज विकास मंचच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे,की नासिक जिल्ह्यातील पिंपळगाव दाभाडी येथील अदिवासी समाजातील
अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केला असून सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी.राज्यात अदिवासी समाजातील महिलांवर होणा-या अत्याचारांमध्ये वाढ झाली असून शासनाने
याप्रकरणी गंभीर दखल गंभीर दखल घ्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अदिवासी समाजातील ४७ जातींना केवळ सात टक्के आरक्षण असून त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे.माजीमंत्री आमदार जयकुमार रावल,माजीमंत्री डॉ.हेमंत देशमुख,मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना अदिवासी समाजासाठी असलेल्या आरक्षणाची माहिती असून देखील त्यांनी कोळी व धनगर समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या पदयात्रेत सहभागी होऊन
मनोगत व्यक्त करून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी.याबाबत शासनाने
दखल न घेतल्यास भिल समाज विकास मंचच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी मंचचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे,सोशल मिडीया प्रमुख सागर वाघ, तालुकाध्यक्ष भैय्या अहिरे,युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष निहाल सोनवणे,लक्ष्मण जावळे,खंडू बोरसे यांचेसह
पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






