एरंडोल : – सुमारे शंभर वर्षांची परंपरा लाभलेला आणि परिसरासह खान्देशात प्रसिध्द असलेल्या हिंदू-मुस्लिम जनतेचे ऐक्य लोकप्रिय उरूस (यात्रा) सालाबादाप्रमाणे 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2023 दरम्यान साजरा होणार आहे. अनेकांचे श्रध्दास्थान असून नवस फेडण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी एरंडोलला येतात. परंतू अलीकडील काही वर्षांपासून यात्रेचे स्वरूप बदलल्याने जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल असून शांतता समितीला बैठक घेण्याची नागरीकांची मागणी आहे.
सुमारे 15 दिवस चालणार्या या यात्रेत मोठी उलाढाल होत असली तरी फसवणूकीचे खेळ, जुगार यामुळे अनेकांना लुबाडले जाते. म्हणूनच प्रशासन, पोलिसांनी (झोपेचे सोंग घेतलेले) जागे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खान्देशातील चोरवड, माहिजी, सारंगखेडा, एरंडोल या प्रमुख यात्रा असून 15 दिवसांच्या अंतराने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजर्या केल्या जातात. या यात्रांमधून मोठी उलाढाल होत असून अनेकांची अपेक्षा, इच्छापूर्ती झाल्याने नवस फेडले जातात. विशेष म्हणजे नथ्थू बापू यात्रेतील गरम भजी आणि गुळाची जिलेबीची चवच न्यारी. त्यामुळे संध्याकाळी अथवा रात्री निवांतवेळी भजी-जिलेबीचा आस्वाद घेतला जातोच.
एक गोष्ट खेदाने नमुद केली जाते की, यात्रेसाठी, खाऊसाठी घरून पैसे आणणारे लहान मुले मात्र फसवणूकीचे खेळ, पत्त्यांचे जुगारात पैसे लावून हरतात आणि उपाशीपोटी घरी येतात. यासाठी पोलिसांच्याच मुकसंमतीने (?) हे सर्व राजरोसपणे चालते हेही तेवढेच खरे. यातून मोठी उलाढाल तर होतेच परंतू अनेकांचे हात ओले होतात त्याचं काय ? मौत का कुवा, धडकगाडी, पाळणे, रेल्वेगाडी मात्र लहानांसह महिलांची आवड. निदान यंदातरी ही फसवेगिरी थांबावी अशी अपेक्षा. यासाठीच शांतता समिती बैठक व्हावी हीच अपेक्षा.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५