मुंबई :- मुलीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने लग्नाची मागणी घातली. मात्र, या लग्नाला नकार देण्यात आला. यानंतर संतापलेल्या तरुणाने मुलीच्या आई-वडिलांना जिवंत जाळून मारले. 22 वर्षांपूर्वी मुंबईत ही घटना घडली होती. या कृत्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. अखेर पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 22 वर्षे फरार असलेल्या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
2001 मध्ये कांदिवली येथील हॉटेलमध्ये हे अग्निकांड घडलं होतं. 48 वर्षीय जहराबी आणि त्यांचे पती अब्दुल रहमान यांना आरोपीने जिवंत जाळले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी यशवंत बाबूराव शिंदे याला दहिसर क्राईम ब्रांचने अटक केली आहे. या प्रकरणातील मोहिद्दीन शेख, नागनाथ तेलंगे आणि व्यंकट पाचावाड या आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, यशवंत शिंदे हा 22 वर्षांपासून फरार होता. अखेर त्याला अटक करण्यात यश आले आहे. या केसची फाईल पुन्हा ओपन करण्यात आली. तपास करणारे पोलीस अधिकारी आरोपीच्या लातूर येथील गावी वारंवार गेले. त्यानंतर क्राईम ब्रांचच्या टीमला यशवंत हा पुण्यातील कोंढवात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ट्रॅप लावला आणि शुक्रवारी यशवंत शिंदे याच्या मुसक्या आवळल्या.
एकतर्फी प्रेम आणि हत्या…
यशवंत हा पेंटिंगचे काम करत होता. मुंबईत काम आणि पैसा अधिक मिळत असल्याने तो आपल्या सहकाऱ्यांसोबत लातूर येथून मुंबईत आला होता. त्याचवेळी जहराबी-अब्दुल यांच्या मुलीवर तो एकतर्फी प्रेम करु लागला. तिच्यासोबत यशवंत लग्न करु इच्छित होता मात्र, जहराबी आणि अब्दुल यांनी लग्नाला नकार दिला. तसेच यशवंतला मारहाण सुद्धा केली. पोलिसांतही तक्रार केली. यानंतर जहराबी आणि अब्दुल यांनी आपल्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलासोबत लावण्याचं ठरवलं. ही माहिती मिळताच यशवंत संतापला आणि त्याने मुलीच्या आई-वडिलांना अद्दल घडवायचं ठरवलं. जहराबी आणि अब्दुल यांचे गुडलक नावाचे चहाचे हॉटेल होते. हे दोघेही हॉटेलमध्येच झोपत असत तर मुलगा आणि मुलगी घरी झोपत असत. 12 ऑगस्ट 2001 रोजी यशवंत शिंदे आपल्या साथीदारासोबत हॉटेलमध्ये शिरला आणि त्याने पेट्रोल टाकून आग लावली. या आगीत जहराबी आणि अब्दुल यांचा होरपळून मृत्यू झाला होता.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४