बाभूळगाव (यवतमाळ): धावत्या दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास वेणी (ता.बाभूळगाव) गावाजवळ घडली. अनिता राजेंद्र जांभूळकर (४५) रा.वेणी (कोठा) असे मृत महिलेचे नाव आहे.
गावाजवळच्या वळणावरच हा अपघात झाला.
वेणी (कोठा) येथील राजेंद्र जांभूळकर हे पत्नीसह दुचाकीने (क्र.एमएच ३२-आर ७१२५) कोठा येथे यात्रेला गेले होते. यात्रेवरून परत येत असताना वेणी गावाजवळील वळणावर मागे बसून असलेल्या अनिता जांभूळकर तोल गेल्याने खाली कोसळल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना लगेच ऑटोरिक्षाने बाभूळगाव ग्रामीण रुग्णालय आणण्यात आले.
डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.अनिता जांभूळकर यांचा मृत्यू झाल्याचे कळताच, त्यांचा मुलगा ऋषिकेश व मुलगी उत्कर्षा यांनी रुग्णालय गाठले. यावेळी दोघांच्याही संमतीने आईचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. नेत्रदानासाठी यवतमाळ येथून चमू बोलवण्यात आला. या चमूने अनिता यांचे नेत्र स्वीकारले. दु:खातून सावरत आईचे नेत्रदान करून या भावंडांनी सामाजिक बांधिलकी पार पाडली.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.