रायगड :- जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोकण रेल्वेखाली उडी मारून एका महिलेने तिच्या दोन मुलींसह आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील घटना आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला आहे.
कोकणकन्या एक्स्प्रेसखाली आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एका महिलेने तिच्या दोन मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेसखाली उडी मारुन आत्महत्या केली आहे. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने तिच्या मैत्रिणीला व्हॉट्सअॅपवर व्हॉइस मेसेज पाठवला होता.
काय घडलं नेमकं?
कोकण रेल्वे खाली उडी मारून माणगावच्या गोरेगाव येथील महिलेने आपल्या मुलीसह आत्महत्या केली आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेस खाली उडी मारून महिलेने मुलीसह आपले जीवन संपवले. दोघींचेही मृतदेह हाती लागले आहेत.
आत्महत्येपूर्वी मैत्रणीला व्हॉइसमेसेज
दरम्यान, महिलेने आत्महत्यापूर्वी आपल्या मैत्रिणीला व्हॉइसमेसेज पाठवला होता. त्यात तिने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून दोन्ही मुलींसह आत्महत्या करत असल्याचे म्हटलं होते. त्यानंतर मैत्रिणीने लगेचच पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली मात्र तिथे महिलेचा व तिच्या एका मुलीचा मृतदेह आढळून आला. मात्र, दुसरी मुलगी अद्याप बेपत्ता आहे. पोलिसांकडून व स्थानिकांकडून तिचा शोध घेण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा