चेन्नई (तामिळनाडू) :- मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमात पडलेल्या प्रियकराने एवढं मोठं पाऊल उचललं की या प्रकरणासंबंधी पोलीसही चक्रावले. त्याने गर्लफ्रेंडची हत्या तर केलीच पण तिच्या मृतदेहाचा फोटोही आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर पोस्ट केला. त्याचे व्हॉट्सअॅप स्टेटस पाहणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला. सुरुवातीला पोलिसांना यावर विश्वास बसला नाही, पण सत्य समोर आल्यावर त्यांना मोठा धक्काच बसला. हे प्रकरण चेन्नई येथील आहे. एका तरुणाने हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडची गळा आवळून हत्या केली.

तरुण 20 वर्षांचा होता आणि त्याची गर्लफ्रेंड देखील 20 वर्षांची होती.दरम्यान, तरुणाच्या स्टेटसवर मृतदेहाचा फोटो पाहिल्यानंतर मृत तरुणीच्या मित्रांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला जवळच्या हॉटेलमधून अटक करुन तपास सुरु केला आहे. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. जवळपासचे सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जात आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, दोघेही पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांनी कोणालाही न सांगता लग्नही केले होते. हॉटेलमधून तरुणीचा मृतदेह सापडला आहे. ही तरुणी केरळमधील कोल्लमची रहिवासी होती. गुपचूप लग्न केल्यानंतर दोघांनाही एक मूल झाले, ज्याला त्यांनी दत्तक दिले होते.
भांडणाचे कारण काय होते?
तरुणीने तरुणाच्या फोनमध्ये इतर महिलांचे फोटो पाहिल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. तिला इतर महिलांच्या फोटोचे कारण जाणून घ्यायचे होते आणि तिने विरोध करण्यास सुरुवात केली. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर प्रियकराने तिला मारहाण करुन टी-शर्टने गळा आवळून खून केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. या हत्येमागे आणखी काही कारण आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






