मुंबई :- कुर्ला येथे धक्कादायक घटना घडली आहे. दोन मैत्रींणींनी मैत्रीणीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगीक छळ केल्याची संतापजनक घटना कुर्ला येथे घडली आहे. त्यानंतर या दोन महिलांनी मुलीला ब्लॅकमेल केले आणि त्यांच्या मित्राने मुलीवर बलात्कार केला. या घटनेने प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या मुलीवर सध्या केरळमध्ये उपचार सुरु आहेत. मुलीचे समुपदेशन केल्यानंतर तिने धक्कादायक खुलासा केला.कुर्ला येथे राहणारी पिडीत मुलीची आई परिचारिका म्हणून एका खासगी रुग्णालयात काम करते. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तिच्या मैत्रीणींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
2021 साली महिलेच्या दक्षिणेकडील दोन मैत्रीणी आणि त्यांचा एक मित्र काही दिवस महिलेचत्या घरी राहायला आल्या होत्या. दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेची नाईट ड्युटी असताना महिलेच्या मैत्रीणींनी मुलीवर लैंगीक अत्याचार केले. शिवाय याबाबत आईकडे काही बोलल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर तिचे विवस्त्र फोटो, व्हिडीओ काढले. एवढ्यावरच न थांबता महिलेंसोबत असलेल्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला. मुलीला दारु पाजून तिचा अत्याचार केला. पण मुलीमध्ये काहीतरी अचानक बदल झाल्याचे आईच्या लक्षात आले. मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. ती अबोल झाली होती.
अखेर महिला मुलीला घेऊन आपल्या मुळ घरी केरळला घेऊन गेली. तिथे तिला समुपदेशकाकडे नेण्यात आले. त्यानंतर मुलगी प्रचंड मानसिक तणाववाखाली असल्याचे समोर आले. समुदेशकांनी तिच्यासोबत झालेल्या लैंगिक छळाबाबत सांगितले आणि त्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले.
मानसोपचारतज्ज्ञाने केरळमधील स्थानिक पोलीस स्टेशनला पत्र लिहून वैद्यकीय-कायदेशीर प्रकरणात फौजदारी गुन्हा नोंदविण्यास अधिकाऱ्यांना सांगितले. केरळ पोलिसांना लेखी तक्रार घेऊन मेडीकल लीगल केस असल्याचे सांगितले, केरळ पोलिसांनी तत्काळ दखल घेत प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर हा गुन्हा कुर्ल्यात घडल्याने आता मुंबई पोलीस हे प्रकरण हाताळत आहेत. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. मुलीचे वकील मरियम निजाम आणि तन्वीर निजाम यांनी सांगितले की, दोन राज्यांच्या अधिकारक्षेत्रामुळे मुलीच्या याचिकेकडे दुर्लक्ष करण्यात आले.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४