भुसावळात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, लॉजवर छापा टाकून महिलांसह ग्राहक ताब्यात

Spread the love

भुसावळ : शहरातील पांडूरंग टॉकीजजवळील आनंद लॉजवर छापा टाकून अवैधपणे सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायाचा भुसावळ पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिलांसह आंबटशौकीन ग्राहकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या कारवाईमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, शहरातील पांडूरंग टॉकीजजवळील आनंद लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी २१ मार्च रोजी सकाळी दुपारी भुसावळ पोलीसाच्या पथकाने अचानक छापा टाकला. सुरूवातील पोलीसांना पाहून ग्राहकांची चांगलीच धांदल उडाली.

यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिला आणि पाच आंबटशौकीनांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बेकायदेशीर व अनैतीक व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह मालकाला ताब्यात घेतले आहे.

टीम झुंजार