मुंबई :- पती-पत्नीचं भांडण झालं तरी ते एकमेकांसोबत बोलायचे जास्त वेळ राहत नाहीत. पती आणि पत्नी संसाराच्या गाड्याची चाके दोघेही चालवत असतात. काही गोष्टींवरून वाद होतो आणि दोघेही विभक्त होण्याचा निर्णय घेतात. मात्र अनेकदा असं होतं की पती नशेबाज असेल तर मारहाण करण्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. मात्र मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडलेली पाहायला मिळाली आहे. पतीच्या एका नकारानंतर त्याने जे काही कृत्य केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईतील मालाड परिसरातील गोरेगाव ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान एका बेकायदा झोपडीत पती आणि पत्नी राहत होते. गुरूवारी संध्याकाळी महिलेच्या पतीने दारू पिण्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र पत्नीने पैसे न दिल्यामुळे त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच बोरिवली जीआरपीने खुनाअंतर्गत गुन्हा दाखल करून अवघ्या 4 तासात आरोपी मोईनुद्दीन अन्सारी याला मालवण परिसरातून अटक केली.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी मुंबईतून पळून जाण्याचा कट आखत होता, मात्र तो पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितलं, परवीन अन्सारी असे मृत महिलेचे नाव आहे.दरम्यान, महिला काबाड कष्ट करून पैसे कमवत असायची आणि तिचा पती महिलेकडून पैसे घेऊन दारू प्यायचा, जेव्हा महिला पैसे देत नाही तेव्हा तो तिला मारहाण करायचा. अनेकवेळा त्याने तिला मारहाण केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा